उल्हासनगरात मांडूळ जातीच्या साप जप्त, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 15:32 IST2018-08-12T15:32:20+5:302018-08-12T15:32:29+5:30
औषध व काळ्या जादूच्या कामासाठी बेकायदा आणलेल्या मांडूळ जातीचा साप जप्त केला असून याप्रकरणी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. बाजार भावानुसार सापाची किंमत 2 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगरात मांडूळ जातीच्या साप जप्त, दोघांना अटक
उल्हासनगर : औषध व काळ्या जादूच्या कामासाठी बेकायदा आणलेल्या मांडूळ जातीचा साप जप्त केला असून याप्रकरणी दोघांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. बाजार भावानुसार सापाची किंमत 2 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-4 महालक्ष्मी हॉल जवळ मांडूळ जातीचा साप विक्री करण्यासाठी दोघेजण येणार, असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. 11 आगष्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दोन संशयित इसम सुतळी गोणी घेऊन फिरत होते. साफळा रचलेल्या पोलिसांनी त्यांना हटकून सुतळी गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये मांडूळ जातीचा साप आढळून आला. पोलिसांनी मांडूळ जातीच्या सापासह दोघांना ताब्यात घेतले. शहरातील भाटिया चौकात राहणाऱ्या अनिल लोचलानी याने मांडूळ जातीचा साप बेकायदेशीररित्या आणून, रामचंद्र सेनानी याने साप विक्रीसाठी स्वतःकडे ठेवल्याचे उघड झाले.
मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुप्त माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी जेरबंद केले. लोचलानी व सेनानी दोघेही कॅम्प नं- 5 परिसरातील भाटिया व प्रेमनगर टेकडी परिसरातील राहणारे आहेत. पोलीस दोघांचीही चौकशी करीत असून अधिक घबाड व माहिती मिळण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.