पहिल्या लग्नानंतर १५ दिवसांत दुसरे लग्न; हेड कन्स्टेबलच्या घरी दोघांनाही रंगेहाथ पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:41 IST2025-04-21T09:41:29+5:302025-04-21T09:41:48+5:30
१६ फेब्रुवारीला नेहाचं नवीनसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिला पतीच्या अफेअरबाबत कळलं.

पहिल्या लग्नानंतर १५ दिवसांत दुसरे लग्न; हेड कन्स्टेबलच्या घरी दोघांनाही रंगेहाथ पकडलं
हापूर जिल्ह्यातील एका विवाहितेने तिच्या पतीवर मंदिरात महिला पोलिस हेड कॉन्स्टेबलशी त्यांच्या लग्नानंतर १५ दिवसांतच दुसऱ्यांदा लग्न केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. महिला हेड कॉन्स्टेबल हापूर जिल्ह्यातील हाफीजपूर पोलिस ठाण्यात तैनात होती. तक्रारदार नेहा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी गजलपूर गावातील रहिवासी नवीन कुमार यांच्याशी तिचा विवाह झाला होता. १ मार्च २०२५ रोजी नवीन आणि महिला हेड कॉन्स्टेबलचा मंदिरात विवाह झाला. नेहाने १६ एप्रिल रोजी रात्री हेड कॉन्स्टेबलच्या घरी दोघांनाही रंगेहाथ पकडले आणि पोलिसांत तक्रार केली.
हापूर जिल्ह्यातील या प्रेमविवाहाची बरीच चर्चा आहे. रसलपूर येथील रहिवासी नेहाने तिचा पती नवीनवर घटस्फोट न घेता दुसरं लग्न केल्याचा आरोप केला आहे. पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केल्यापासून दोन्हीही आरोपी फरार आहेत. १६ फेब्रुवारीला नेहाचं नवीनसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तिला पतीच्या अफेअरबाबत कळलं. पती एका महिला हेड कॉन्स्टेबलच्या प्रेमात असल्याचं पत्नीला कळाल्यानंतर तिने १६ एप्रिलच्या रात्री ९ च्या सुमारास या दोघांना साकेत कॉलनीतील महिला हेड कॉन्स्टेबलच्या घरात पकडले.