इंटरनेटवर AK-47 सर्च केलं अन् भररस्त्यात तरुणीला संपवलं; एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:47 IST2022-02-22T19:45:18+5:302022-02-22T19:47:25+5:30
भररस्त्यात निर्घृण खून; हत्या करून व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला

इंटरनेटवर AK-47 सर्च केलं अन् भररस्त्यात तरुणीला संपवलं; एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या
सूरत: गुजरातच्या सूरतमध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रीष्मा वेकरिया नावाच्या तरुणीची १२ फेब्रुवारीला चाकू भोसकून हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून फेनिल गोयाणी नावाच्या तरुणानं ग्रीष्माचा निर्घृणपणे खून केला. धक्कादायक बाब म्हणजे फेनिलनं या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला.
फेनिलनं ग्रीष्माची हत्या करण्यापूर्वी इंटरनेटवर एके-४७ आणि इतर हत्यारांबद्दल सर्च केलं. त्यासोबतच त्यानं एक वेब सीरिजदेखील पाहिली होती. सूरतमधल्या कामरेज इथे ग्रीष्माची हत्या झाली. आरोपी फेनिलला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली. ग्रीष्माच्या हत्येसाठी पोलिसांनी चाकूचा वापर केला. त्यासाठी तो अनेक दुकानांमध्ये गेला होता. पोलीस त्याला त्या सगळ्या दुकानांमध्ये घेऊन गेले.
पोलिसांनी या प्रकरणात २५०० पानांचं आरोपपत्र तयार केलं. यामध्ये १९० साक्षीदारांचे जबाब आहेत. पोलिसांनी सगळ्या साक्षीदारांचे जबाब त्यांच्या घरी जाऊन घेतले. फेनिलला अटक केल्यानंतर ४ दिवसांनी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं.
सूरत रेंजचे आयजी राजकुमार पांडियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं हत्येपूर्वी इंटरनेटवर एके-४७ आणि अन्य शस्त्रास्त्रांबद्दलची माहिती सर्च केली. याशिवाय एक वेब सीरिजदेखील पाहिली. हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. यामध्ये ५० पोलिसांचा समावेश आहे.