शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मौलाना सादसंबंधित उत्तर प्रदेशातील बँक खाती केली सील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 14:47 IST

आतापर्यंत मौलाना साद आणि मरकझशी संबंधित लोकांची 32 बँक खाती समोर आली आहेत.

ठळक मुद्देगुन्हे शाखेने सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाला कळविले होते. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या बँक खात्यांची संख्या 7 ते 8 असल्याचे सांगितले जाते. ही बँक खाती देखील सील करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशात मिळाली.

आयकर विभागाने निझामुद्दीनस्थित तबलिगी मरकझ प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आयकर विभागाने गुन्हे शाखेकडून काही कागदपत्रे मागितली होती. बँक खाती आणि पैशांच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती गुन्हे शाखेने आयकर विभागाकडे दिली आहे. दिल्ली पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व्यतिरिक्त आयकर विभाग ही तिसरी एजन्सी बनली आहे, ज्याने मरकज प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत मौलाना साद आणि मरकझशी संबंधित लोकांची 32 बँक खाती समोर आली आहेत.गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हे शाखेने सीबीआय, ईडी आणि आयकर विभागाला कळविले होते. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, मौलाना मोहम्मद साद आणि त्याच्या साथीदारांना उत्तर प्रदेशातील काही बँक खाती सापडली आहेत. या बँक खात्यांची संख्या 7 ते 8 असल्याचे सांगितले जाते. ही बँक खाती देखील सील करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशात मिळाली.

मौलाना साद यांचे दोन निकटवर्तीय क्राईम ब्रँचच्या रडारवर

 

Palghar Mob Lynching : पोलीस अधीक्षकांना पाठविले सक्तीच्या रजेवर

 

Coronavirus : खळबळजनक! आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ पोलिसांना कोरोना

गुन्हे शाखेच्या तपासणीत मरकज आणि त्याच्या साथीदारांची 32 बँक खाती सापडली आहेत. मरकजचे मुख्य खाते लाल कुआन (जुनी दिल्ली) मधील बँक ऑफ बडोदा शाखेत आहे. या बँक खात्यातून मरकजकडे दररोज व्यवहार होत असत. या खात्यातून दररोज पैसे काढले आणि जमा केले जात. देणगी रूपात मरकज यांना दिलेली रक्कम या बँक खात्यात जमा झाली.

झाकीर नगर येथून कागदपत्रे जप्त केलीदुसरीकडे गुन्हे शाखेने जामिया नगरच्या जाकिर नगर (पश्चिम) येथे मरकज मॅनेजमेंटशी संबंधित व्यक्तीच्या घरावर छापा टाकला होता. या व्यक्तीच्या घरातून आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. झाकीर नगरमध्ये विचारपूस केल्यावर मौलाना साद यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली. असे सांगितले जात आहे की, झाकीर नगर येथे राहणारी ही व्यक्ती जमातसाठी ये-जा करण्याची व्यवस्था करीत असे. रेल्वेच्या तिकिटांच्या बुकिंगसाठी युनिक आयडी आहे. असे किती लोक अजूनही लपून आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सPoliceपोलिसdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशbankबँक