गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील एका शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने रागाच्या भरात एका शिक्षकावर हल्ला केला. अवघ्या काही सेकंदात त्याने शिक्षकाला १८ वेळा मारलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपी मुख्याध्यापकांविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरूचमधील जंबुसर शहरातील नवयुग शाळेत ही घटना घडली. हितेंद्र सिंह ठाकोर असं आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे, तर राजेंद्र परमार असं शिक्षकाचं नाव आहे. काही तक्रारी आल्यानंतर हा वाद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. मुख्याध्यापकांनी शिक्षकाला चर्चेसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावलं होतं.
भरूच जिल्हा शिक्षण अधिकारी स्वातिबा रावल यांनी सांगितलं की, संस्थेच्या व्यवस्थापनाने शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र सिंह ठाकोर यांना चौकशीदरम्यान शाळेत येण्यास मनाई केली आहे. शाळेने प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ठाकोर त्यांच्या केबिनमध्ये बसून राजेंद्र परमारशी बोलत असल्याचं दिसून आलं आहे. त्याच्यासोबत समोर काही इतर सहकारीही बसले होते. अचानक ठाकोर खुर्चीवरून उठतात.
राजेंद्र परमारकडे धावतात. यानंतर मारहाण केली. त्यानंतर ठाकोर यांनी परमारला खाली खेचलं आणि इतर लोकांच्या उपस्थितीत अनेक वेळा मारलं. शाळा व्यवस्थापनाने ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या शाळा व्यवस्थापनाने त्यांना शाळेत येण्यास मनाई केली आहे.