शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

भितीदायक! असिस्टंट जनरल मॅनेजरने पत्नीची हत्या करून मृतदेह घरातच जाळला; विचारल्यावर सांगितले 'हे' कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 15:58 IST

The assistant general manager killed his wife : थोड्या वेळाने अनिलने आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, त्यांना पत्नी अनुपमावर संशय होता.

ठळक मुद्देआरोपी पत्नी अनुपमा आणि तीन मुले यांच्यासह बंगाच्या एनआरआय कॉलनीत राहत होता. मंगळवारी संध्याकाळी अनिल त्याचा आठ वर्षांचा मुलगा, पाच वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगा घेऊन कंपनीच्या कार्यालयात आला.

पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी रोपड़-फगवाड़ा मुख्य रस्ता आणि उड्डाणपूल बनविणार्‍या जीआर इन्फ्रा कंपनीच्या सहाय्यक महाव्यवस्थापकाने पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि नंतर मृतदेह घरातच जाळला. कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांच्या माहितीवरून बंगा शहर  पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घरातून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्टेशन प्रभारी विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील कुछ माट्ठा गावात राहणारा अनिल कुमार जीआर इन्फ्रा कंपनीत सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून तैनात आहे. बंगा येथे कंपनी उड्डाणपूल बांधत आहे. आरोपी पत्नी अनुपमा आणि तीन मुले यांच्यासह बंगाच्या एनआरआय कॉलनीत राहत होता. मंगळवारी संध्याकाळी अनिल त्याचा आठ वर्षांचा मुलगा, पाच वर्षाची मुलगी आणि तीन वर्षाचा मुलगा घेऊन कंपनीच्या कार्यालयात आला. तेथे त्याने तिन्ही मुलांबरोबर जेवण केले. यावेळी तेथे उपस्थित इतर कर्मचार्‍यांनी अनिल कुमारला पत्नी न येण्याबाबत विचारले. पण त्याने कोणतेही ठोस उत्तर दिले नाही.

थोड्या वेळाने अनिलने आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, त्यांना पत्नी अनुपमावर संशय होता. यामुळे त्याने अनुपमाचा गळा घोटला आहे. यानंतर मृतदेह जाळण्यात आला. स्टेशन प्रभारीच्या मते, यानंतर कंपनीचे अधिकारी बलबीर सिंग यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी अनिलला अटक केली. पोलिसांनी एनआरआय कॉलनी येथील आरोपीच्या घरातून अनुपमाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. कंपनी अधिकारी बलबीर सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे अनिल कुमारविरूद्ध खुनासह अनेक कलमांत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे.

टॅग्स :MurderखूनPunjabपंजाबPoliceपोलिसArrestअटक