मित्राला वाचवले, मात्र स्वतः प्रवाहात गेला वाहून; शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 21:03 IST2019-07-26T20:48:21+5:302019-07-26T21:03:08+5:30

भिवंडीतील चिंबीपाडा येथील घटना; बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेलेला तरुण बेपत्ता

Saved a friend, but carried himself into the stream; Search started | मित्राला वाचवले, मात्र स्वतः प्रवाहात गेला वाहून; शोध सुरु

मित्राला वाचवले, मात्र स्वतः प्रवाहात गेला वाहून; शोध सुरु

ठळक मुद्देकैलास हा माजी शिवसेना नगरसेवक रोहिदास भगत यांचा भाऊ आहे.तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरु आहे.  

भिवंडी - मित्रांसोबत मौजमजेसाठी पोहायला गेलेला तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी भिवंडीतील चिंबीपाडा येथील वारणा नदीच्या बंधाऱ्यावर घडली आहे. कैलास तुकाराम भगत ( 32 रा.नागांव ) असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नांव आहे. कैलास हा माजी शिवसेना नगरसेवक रोहिदास भगत यांचा भाऊ आहे. सदर तरुण त्याच्या मित्रांसोबत चिंबीपाडा येथील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता.

मित्रांसोबत दुपारी जेवण झाल्यावर सात ते आठ मित्र दुपारनंतर पोहण्यासाठी बंधाऱ्याच्या पाण्यात उतरले. मात्र दिवसभर पाऊस सुरु असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढून बंधाऱ्यावरून पाण्याचा जोराने विसर्ग सुरु होता. यावेळी कैलास याचा मित्र महेश भगत हा खोल पाण्यात वाहून जात असताना त्याला कैलास व त्याच्या मित्रांनी सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र याच दरम्यान कैलास हा पाण्याच्या वेगवान भोवऱ्यात सापडल्याने तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे. त्याचा तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरु आहे.  

Web Title: Saved a friend, but carried himself into the stream; Search started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.