शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

घराला टाळे ठोकून सौरभ त्रिपाठींचे कुटुंबीयही गायब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 06:32 IST

Saurabh Tripathi News: अंगडिया वसुली प्रकरणात पसार असलेल्या मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या मेहुण्याच्या अटकेनंतर, त्रिपाठी यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात पसार असलेल्या मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या मेहुण्याच्या अटकेनंतर, त्रिपाठी यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, त्यांच्या लखनऊ येथील घराला टाळे ठोकून त्रिपाठींचे कुटुंबीयही गायब आहे. गुन्हे शाखेने सहायक विक्रीकर आयुक्त आशुतोष मिश्रा (३७) यांना उत्तर प्रदेशमधून बुधवारी अटक केली आहे. मिश्रा हे निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे मेहुणे असून हवालाच्या माध्यमातून पाठविलेली खंडणीची रक्कम स्वीकारल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. मिश्रा हे याप्रकरणात अटक झालेले पाचवे आरोपी आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडे हप्त्याची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्याचा गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) तपास करत आहे. सीआययूने याप्रकरणी ओम वंगाटे, नितीन कदम, समाधान जमदाडे यांच्यासह त्रिपाठींच्या लखनऊ येथील घरात काम करणाऱ्या पप्पूकुमार गौड याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई