शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

"ती चांगली मुलगी, तू..."; स्नॅपचॅटवर आई असल्याचं भासवून मुस्कान साहिलला करायची मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:26 IST

Saurabh Rajput : साहिलच्या आईचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. तरीही, साहिलला खात्री होती की, तो त्याच्या मृत आईशी बोलू शकतो.

मेरठमधील भयानक सौरभ राजपूत हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांच्याबद्दल दररोज नवीन खुलासे होत आहेत. मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या करण्याचा कट रचला होता आणि एकदा तिचा हा डाव फसला होता असं समोर आलं आहे. पण ४ मार्च रोजी तिने केवळ तिचा पती सौरभची हत्या केली नाही तर तिच्या मृतदेहाचे क्रूरपणे तुकडे केले, ड्रममध्ये ठेवले. इतक्या हुशारीने खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर, दोघेही कोणतीही चिंता न करता मनालीला फिरण्यासाठी निघून गेले.

तपासादरम्यान पोलिसांना असं आढळून आलं की, साहिल शुक्ला तंत्र-मंत्र आणि जादूटोण्यावर दृढ विश्वास ठेवत होता. साहिलच्या आईचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. तरीही, साहिलला खात्री होती की, तो त्याच्या मृत आईशी बोलू शकतो. मुस्कानला हे सर्व चांगलंच माहित होतं पण आता पोलिसांसमोर आणखी एक खुलासा झाला आहे. मुस्कानने स्नॅपचॅटवर तीन फेक आयडी तयार केले होते. ज्यामध्ये एक आयडी साहिलच्या आईच्या नावावरही होता. मुस्कान या तिन्ही अकाउंटवरून चॅट करत असे. "मुस्कान एक चांगली मुलगी आहे. तू तिच्यासोबत आनंदी राहशील" असं ती मेसेजमध्ये म्हणायची.

"मुस्कान चांगली मुलगी आहे"

साहिल शुक्ला अत्यंत अंधश्रद्धाळू होता. त्याला आई नव्हती. पण तो त्याच्या आईशी स्नॅपचॅटवर बोलत असे. त्याला वाटायचं की त्याची मृत आई त्याच्याशी बोलायची. मुस्कानलाही हे माहित होतं. मुस्कानने तिच्या भावाच्या मोबाईल नंबरवर हे अकाऊंट सुरू केलं होतं. त्याच नंबरवरून ती साहिलला त्याची आई म्हणून मेसेज करायची  मुस्कान एक चांगली मुलगी आहे, तू तिच्यासोबत आनंदी राहशील असं सारखं म्हणायची. आईची ही आज्ञा समजून, साहिल मुस्कानवर आणखी प्रेम करू लागला. एवढंच नाही तर या अंधश्रद्धेमुळेच तो मुस्कानला सांगायचा की, तो सौरभचा वध करेल. 

आनंदाचं नाटक... हसत नाचत होती मुस्कान; सौरभसोबतचा 'तो' शेवटचा Video, लेक होती सोबत

मेरठमधील सौरभ हत्याकांड प्रकरणात एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी मुस्कान तिची मुलगी पिहू आणि पती सौरभसोबत नाचताना दिसत आहे. पिहूचा वाढदिवस २८ फेब्रुवारी रोजी होता आणि हा व्हिडीओ त्याच दिवशीचा असल्याचं म्हटलं जातं. व्हिडिओमध्ये मुस्कान तिचा पती आणि मुलीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये आनंदाने नाचत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नसली तरी तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस