शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

सौरभ राजपूतची 'ही' छोटीशी चूक ठरली त्याच्या मृत्यूचं कारण; मुस्कानच्या आईचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:41 IST

सौरभ हत्याकांडात दररोज मोठे खुलासे होत आहेत. आता मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे.

सौरभ हत्याकांडात दररोज मोठे खुलासे होत आहेत. आता मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे. सौरभची एक छोटीशी चूक त्याच्याच मृत्यूचं कारण बनली असं म्हटलं आहे. मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "आम्ही लग्नापूर्वी कधीही मुस्कानला फोन दिला नाही. पण लग्नानंतर सौरभने स्वतः तिला फोन वापरण्याची परवानगी दिली." 

"सौरभनेच मुस्कानला साहिलशी बोलण्याची परवानगी दिली होती कारण ते दोघेही वर्गमित्र होते. पण ही छोटीशी चूक नंतर त्याच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण बनली. सौरभचा त्याच्या पत्नीवर खूप विश्वास होता, पण हा विश्वास त्याची सर्वात मोठी कमजोरी बनली. मुस्कानची संगत चुकीची होती. पण सौरभला तो कोणता मार्ग निवडत आहे याची काहीच कल्पना नव्हती."

"आमच्या मुलीने जे केलं ते अक्षम्य आहे. जर मुस्कान दोषी असेल तर तिला सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दोघांनाही फाशी दिली पाहिजे." हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय बनलं आहे. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, सौरभची हत्या अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आली होती. त्याचा मृतदेह निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता.

मुस्कानने ३३ रुपयांना खरेदी केलं नशेचं इंजेक्शन; मेडिकल स्टोअरवरील छाप्यात धक्कादायक खुलासे

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. हत्या प्रकरणातील आरोपी आणि मृत सौरभची पत्नी मुस्कानबाबत आणखी धक्कादायक माहिती मिळाली आहे. मुस्कानला औषधं देणाऱ्या मेडिकल स्टोअरवर छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या पथकाने रविवारी उषा मेडिकल स्टोअरवर छापा टाकला. मुस्कानने ३३ रुपयांचे मेझोलम नावाचं नशेचं इंजेक्शन देखील खरेदी केलं होतं. मुस्कानने तिच्या मोबाईलमधील प्रिस्क्रिप्शन दाखवून हे  खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस