"सत्यमेव जयते"... आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 07:44 PM2021-10-20T19:44:04+5:302021-10-20T19:44:50+5:30

Aryan Khan : निष्णात वकील आर्यन खानच्या सुटकेसाठी सरसावले असले तरी कोर्टाने मोठा दणका देत आर्यनच्या जामिनाला नकार दिला.

"Satyamev Jayate" ... Sameer Wankhede's suggestive reaction after Aryan Khan's bail was rejected | "सत्यमेव जयते"... आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची सूचक प्रतिक्रिया

"सत्यमेव जयते"... आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची सूचक प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देदोनच शब्दांत साऱ्या प्रकरणाबद्दल सूचक प्रतिक्रिया दिली ते दोन शब्द होते `सत्यमेव जयते!`. अगदी दोन बोटे उंचावून आपली प्रतिक्रिया देत ते न्यायालयातून बाहेर पडले. 

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूज ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने २ ऑक्टोबरला अटक केली आहे. त्याच्या जामिनावर आज एनडीपीएस कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी त्याचा जामीन कोर्टाने फेटाळून लावला. त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दोन अक्षरी सूचक वक्तव्य केलं आणि त्याकडे मीडियाचं लक्ष आकर्षिलं गेलं. त्यांनी दोनच शब्दांत साऱ्या प्रकरणाबद्दल सूचक प्रतिक्रिया दिली ते दोन शब्द होते `सत्यमेव जयते!`. अगदी दोन बोटे उंचावून आपली प्रतिक्रिया देत ते न्यायालयातून बाहेर पडले. 

आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीची आज शेवटची रात्र असून उद्या न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्याला आणखी किती काळ तुरुंगात राहावे लागणार आहे हे उद्या कोर्ट ठरवणार आहे.  गेले काही दिवस NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे ड्रग्ज कारवाईवरून आर्यन खानला केलेल्या अटकेनंतर उफाळलेल्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यावर गेले काही दिवस टीका होत आहे. त्यांनतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी देखील त्यांनी कायदेशीर बाबी लक्षात घेऊन कारवाई केली असून आम्ही पुराव्याच्या आधारावर बोलतो, जे काही बोलायचे ते कोर्टात बोलणार अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी सत्यमेव जयते असं म्हटलं. 

तसेच आज देखील साऱ्या बॉलिवूडचं आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणीकडे लक्ष लागलं होतं. मात्र, कोर्टाने दणका देत आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. निष्णात वकील आर्यन खानच्या सुटकेसाठी सरसावले असले तरी कोर्टाने मोठा दणका देत आर्यनच्या जामिनाला नकार दिला. त्यावेळी एनडीपीएस कोर्टातून बाहेर पडताना समीर वानखेडे यांनी दोनच शब्दांत साऱ्या प्रकरणाबद्दल सूचक प्रतिक्रिया दिली आणि म्हणले `सत्यमेव जयते!`. नंतर दोन बोटे उंचावून आपली प्रतिक्रिया देत ते न्यायालयातून बाहेर पडले.

Web Title: "Satyamev Jayate" ... Sameer Wankhede's suggestive reaction after Aryan Khan's bail was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app