पोलिसांपासून वाचण्यासाठी उडी मारल्याने सराईत गुन्हेगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 02:55 IST2020-07-17T02:55:02+5:302020-07-17T02:55:18+5:30
मंगळवारी येथील कौसा भागातील सैनिकनगर परिसरातील डोंगरावर बक-या पाळत असलेल्या हुसेन शेख याच्याकडे त्याने मेंढ्याची मागणी केली होती.

पोलिसांपासून वाचण्यासाठी उडी मारल्याने सराईत गुन्हेगाराचा मृत्यू
- कुमार बडदे
मुंब्रा : पोलीस पकडण्यासाठी आल्याचे कळताच त्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी मोहसिन चीरा या एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या माळ्यावरून उडी मारली, यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मुंब्य्रात घडली.
मंगळवारी येथील कौसा भागातील सैनिकनगर परिसरातील डोंगरावर बक-या पाळत असलेल्या हुसेन शेख याच्याकडे त्याने मेंढ्याची मागणी केली होती. तो देण्यास नकार दिल्यामुळे चीराने शेख याच्यावर आणि त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या दाऊद या दोघांवर धारदार शस्त्र तसेच लोखंडी वस्तूने प्रहार केला. यात दोघे जखमी झाले. याबाबत दाखल तक्रारीवरून चीरा याला पकडण्यास बुधवारी पोलीस गेले होते. पोलीस आल्याचे कळताच त्याने एका निर्माणाधीन इमारतीच्या दुसºया मजल्यावरून उडी मारली. यात गंभीर जखमी झालेल्या चीराचा उपचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यू झाला.