शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शारदा चिट फंड घोटाळा : राजीव कुमारांच्या अटकपूर्व जामिनासाठी पत्नीची कोर्टात धाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:10 IST

कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्नीने कोलकाता हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला

ठळक मुद्देसीबीआयने आरोप केला आहे की बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी कुमार यांनी घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कोलकाता हायकोर्टाने नुकताच राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती हटविल्याने सीबीआयने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. सीबीआयने चौकशीच्या नाड्या आवळत भूमिगत झालेल्या राजीव कुमार यांचा माग काढण्यासाठी कंबर कसली आहे.

कोलकाता - शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्नीने कोलकाता हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नुकतीच सीबीआयच्या पथकाने राजीव कुमार यांच्या घरावर छापेमारी केली असून कुमार यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयच्या विशेष पथके भाबनी भवनस्थित सीआयडी कार्यालयासह शहरातील अनेक कार्यालयांत दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त यांचा माग काढण्यासाठी सीबीआयचे पथक दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील एका रुग्णालयात देखील पोचले होते.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खास मर्जीतील पोलीस अधिकारी आणि कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार चौकशीसाठी १४ सप्टेंबरला सीबीआयसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे सीबीआयने चौकशीच्या नाड्या आवळत भूमिगत झालेल्या राजीव कुमार यांचा माग काढण्यासाठी कंबर कसली आहे. बंगालमधील गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिट फंडच्या घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी १४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता कोलकाता येथील सीजीओ कॉम्‍प्‍लेक्‍सच्या ऑफिसमध्ये  हजर राहण्यासठी सीबीआयने राजीव कुमार यांना नोटीस पाठवली होती. कोलकाता हायकोर्टाने नुकताच राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती हटविल्याने सीबीआयने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. न्यायालयाने राजीव कुमार यांच्या अटकेवरचा स्थगिती रद्द करताना, त्यांची सीबीआयचा समन्स रद्द करण्याचीही मागणी फेटाळली होती. राजीव कुमार यांनी या समन्सला उत्तर दिले नाही. तसेच ते भूमिगत झाले. दरम्यान, कुमार यांच्या पत्नीने कोलकाता हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.कोलकाताचे माजी आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सीबीआयने आरोप केला आहे की बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी कुमार यांनी घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागArrestअटकMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगाल