शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनसेला दणका! संदीप देशपांडे यांच्यासह इतर ३ मनसैनिकांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 19:03 IST

तिघांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कलम ३५३, १४१, १४२, १४३, ५०४, ५०६ नुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संदीप देशपांडे यांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई - पालिकेच्या अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह इतर तिघांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३, १४१, १४२, १४३, ५०४, ५०६ नुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून १४ नोव्हेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का, असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.तसेच, मनसेला टार्गेट केल्या जात असल्याचे देशपांडे म्हणाले. हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिघावकर यांना दिला. मनसेच्या कंदिलांवरून महापालिकेच्या कारवाईनंतर दादर-माहिम मधलं राजकीय वातावरण तापलेलं आहे

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेPoliceपोलिसMNSमनसेCourtन्यायालय