शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
5
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
6
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
7
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
8
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
9
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
11
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
12
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
13
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
14
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
15
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
16
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
17
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
18
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
19
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक

साताऱ्यात चंदन तस्करी करणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 17:59 IST

तिघांना अटक; १० हजार रुपयांचा ऐवज जप्त

ठळक मुद्देशहर पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला सैनिक स्कूलसमोरील चंदनाच्या झाडांची चोरी हे तिघे नेहमी करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.चार-पाच महिन्यांतून एकदा तरी या ठिकाणी चोरीचा प्रकार घडत होता.

सातारा - येथील सैनिक स्कूलच्या आवारातील चंदनाच्या झाडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.सुनील संजय काळे, महेश बाळू बाबर (वय ३६), लक्ष्मण उर्फ बापू कुंदन भोरे (वय ३५, सर्व रा. आकाशवाणी केंद्राजवळ, नामदेववाडी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी सैनिक स्कूलच्या आवारामध्ये चंदनाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांची गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चोरी होत होती. चार-पाच महिन्यांतून एकदा तरी या ठिकाणी चोरीचा प्रकार घडत होता. मात्र, चंदनाच्या झाडांची नेमके कोण चोरी करत आहे, हे समोर येत नव्हते. दरम्यान, चंदनाच्या झाडांची विक्री करण्यासाठी संशयित सुनील काळे हा सातारा फलटण रस्त्यावरील पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना खास खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला शनिवारी सायंकाळी तेथे तत्काळ पाठविले. त्यावेळी पोलिसांनी सुनील काळेसोबत असलेल्या महेश आणि लक्ष्मण या दोघांनाही तेथे अटक केली. पोत्यामध्ये ठेवलेले चंदनाचे तुकडे या तिघांकडून पोलिसांनी जप्त केले. सैनिक स्कूलसमोरील चंदनाच्या झाडांची चोरी हे तिघे नेहमी करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.शहर पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आणखी कुठे त्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का? याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, हवालदार सुधीर बनकर, तानाजी माने, मुबीण मुलाणी, संतोष पवार, शरद बेबले, विजय कांबळे, नीलेश काटकर, प्रवीण फडतरे यांनी भाग घेतला.

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसSmugglingतस्करीSatara areaसातारा परिसर