शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! धामणगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 16:28 IST

अवैध रेती नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करीत असताना चांदूर रेल्वेचे प्रभारी एसडीओ तथा धामणगावच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियाच्या ट्रकने उडवले.

 - मोहन राऊत धामणगाव रेल्वे (अमरावती) - अवैध रेती नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करीत असताना चांदूर रेल्वेचे प्रभारी एसडीओ तथा धामणगावच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियाच्या ट्रकने उडवले. यात तहसीलदार, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजता सातेफळ फाट्याजवळ घडली. धामणगावचे तहसीलदार अभिजीत नाईक हे शासकीय वाहन क्रमांक एम एच २७ एए ५०३ ने चांदूर रेल्वेकडे एसडीओंचा प्रभार सांभाळण्याकरिता जात होते. सातेफळ फाट्याजवळ रेतीने अर्धवट भरलेला ट्रक क्रमांक एमएच २७ बीएक्स २९० च्या चालकाला संबंधित ट्रक थांबण्यासाठी हात दाखविला असता ट्रकचालकाने थेट तहसीलदारांच्या गाडीवर ट्रक चढविला. यात तहसीलदार अभिजित नाईक (४०) गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठीला, हाताला दुखापत झाली, तर चालक महेंद्र नागोसे यांच्या पाठीला मुका मार लागला आहे. कर्मचारी बठे यांना डोक्याला मार लागलाय तिघांना चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रेती चालकाने मुद्दामपणे शासकीय वाहनाला उडवून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार तहसीलदार अभिजित नाईक यांच्यावतीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. आमदार वीरेंद्र जगताप जि.प. सदस्य अनिता मेश्राम यांनी  तहसीलदार  नाईक यांची भेट घेऊन विचारपूस केली. विधान परिषदेचे आमदार अरुण अडसड यांनी भ्रमणध्वनीद्वारे नाईक यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेऊन घटने ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कळविली. प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी घटने विषयी माहिती जाणून घेतली तळेगाव दशासर व चादूर रेल्वेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळ गाठले आहे.

सुदैवाने बचावले प्राणया भीषण अपघातात तहसीलदारांचे शासकीय वाहन ४० फुटापर्यंत घासत गेले. नशीब सुदैवाने आम्ही थोडक्यात बचावलो, असे तहसीलदार अभिजित नाईक म्हणाले. धामणगाव महसूल प्रशासनाने आठ दिवसांत रेती वाहतुकीविरुद्ध आठ ट्रक चालकांवर कारवाई केली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी