शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

एनसीबीच्या टार्गेटवर आता सॅमचा बॉस !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 6:02 AM

ड्रग अंकल म्हणून परिचित : हाय प्रोफाइल नावे पुढे येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर नार्काेटिक्स कंट्रोल बोर्डचा (एनसीबी) तपास आता या क्षेत्रात बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी अटक केलेला तस्कर राहिल विश्राम हा बॉलिवूडमधील या बॉसच्या सूचनेनुसार अमली पदार्थांची डिलिव्हरी करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पथकाकडून आता त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तस्कर राहिल विश्राम हा चित्रपटसृष्टीत सॅम ड्रग अंकल म्हणून ओळखला जात होता. या नावाने त्याच्याकडे मालाची मागणी केली जात असे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.राहिलकडे केलेल्या चौकशीतून या नशाबाजीमध्ये गुंतलेल्या अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. राहिल हा बॉस या नावाने बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाणाºया व्यक्तीच्या सांगण्यावरून ड्रग्ज संबंधित व्यक्तींना पुरवित असे. त्याचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध असून तो अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्माता यापैकी कोणीही असू शकतो. त्याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्राने सांगितले.बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्र वर्ती यांच्या अटकेनंतर राहिल विश्वास याच्यावरील कारवाई मोठी मानली जाते. सॅम ड्रग अंकल म्हणून ओळखल्या जाणाºया राहिलकडून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येणार आहेत.‘त्या’ पार्टीच्या व्हिडीओची सत्यता पडताळणारकरण जोहरच्या पार्टीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अमली पदार्थांचा वापर करण्यात आला होता की नाही, याची चौकशीही एनसीबीकडून सविस्तरपणे करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणतीही गडबड केली जाणार नाही. कथित व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या चौकशीतून नेमके पुढे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.वसईतून चार कोटींचे कोकेन जप्त1एनसीबीच्या पथकाने शुक्र वारी वसई येथे छापा घालून मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त केला. त्याची किंमत चार कोटी असून याप्रकरणी एस. घंगाळेला अटक केली आहे.2तो प्रॉपर्टी डीलर असून त्याच्याकडून अमली पदार्थाचे सेवन करीत असलेली हाय प्रोफाइल नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इथिओपियाच्या अदिस अबाबा येथून दिल्लीत आलेल्या एका पार्सलमधून ६७० ग्रॅम कोकेन जप्त केले होते.3त्याच्या तपासाचा प्रवास वसईपर्यंत पोहोचला आहे. याबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक (अभियान ) केपीएस मल्होत्रा यांनी शनिवारी दिल्लीत एका वृत्तसंस्थेला सांगितले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती