समीर वानखेडेंचा ४ तास जबाब नोंदवला; पण आरोप करणारे झाले गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 08:13 PM2021-10-27T20:13:47+5:302021-10-27T20:16:13+5:30

Sameer Wankhede's statement was recorded : किरण गोसावी याने देखील एनसीबीसमोर येऊन आपली बाजू मांडावी, असे सिंह यांनी सांगितले.

Sameer Wankhede's statement was recorded for 4 hours; But the accusers disappeared | समीर वानखेडेंचा ४ तास जबाब नोंदवला; पण आरोप करणारे झाले गायब

समीर वानखेडेंचा ४ तास जबाब नोंदवला; पण आरोप करणारे झाले गायब

Next
ठळक मुद्देमी मीडियाच्या माध्यमातून किरण गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांनी आपली बाजू मांडावी,असे सिंह यांनी सांगितले.

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने गौप्यस्फोट करत किरण गोसावी आणि समीर वानखे़डे यांच्यावर डील करत असल्याचा खळबळजनक आरोप केला. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेतली, असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होत. प्रभाकर साईल याच्या २५ कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा आज जबाब नोंदवण्यात आला, असं एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. परंतु, २५ कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी उद्या किंवा परवा एनसीबीसमोर आपला जबाब नोंदवण्याची हजर व्हावे, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. 

आज समीर वानखेडे यांचा जवळपास साडेचार तास जबाब नोंदवला. येत्या काळात त्यांची आणखी काही मदत घेतली जाईल. या तपासाला पुढे चालू राहू द्यावं. गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी तपासाला सहकार्य करावे. आमच्याकडे असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न झाला. एकाच्या घराला टाळा होता. तर दुसऱ्याचा पत्ता तपासला जात आहे. त्यामुळे त्यांना नोटीस पोहोचली नाही. त्यांनी उद्या-परवा या दोन दिवसात वांद्र्यात सीआरपीएफ मेस येथे येऊन आपली बाजू मांडावी, असं ज्ञानेश्वर सिंह म्हणाले.

 

Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी

त्याचप्रमाणे किरण गोसावी याने देखील एनसीबीसमोर येऊन आपली बाजू मांडावी, असे सिंह यांनी सांगितले. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर आज पाच सदस्यीय टीम दिल्लीहून मुंबईत पोहोचली. जे मुख्य पंच आहेत प्रभाकर साईल आणि गोसावी यांना नोटीस पाठवून त्यांनी मीडियात जे काही सांगितले आहेत ते समितीपुढे मांडावे. पण आमच्या प्रयत्नानंतरही त्यांना नोटीस पाठवता आलेली नाही, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले. मी मीडियाच्या माध्यमातून किरण गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांनी आपली बाजू मांडावी,असे सिंह यांनी सांगितले.

दुसरीकडे मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात  साक्षीदार असलेल्या किरण गोसावी ह्याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल ह्यांनी आर्यन खान च्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता.तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना असून प्रभाकर साईल ह्यांनी आपल्या प्रोफाइल फोटो दुरुपयोग केल्याची आणि ह्या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.

 

Web Title: Sameer Wankhede's statement was recorded for 4 hours; But the accusers disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.