शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ?, समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 20:23 IST

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या मेहुणीने दाखल केलेल्या तक्रारीमुळे नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांनी सोमवारी (८ नोव्हेंबर) एक ट्विट करत समीर वानखेडेंना प्रश्न विचारला होता. या ट्वीटमध्ये मलिकांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीचा उल्लेख केला होता. याच ट्विटवरून आता वानखेडे यांच्या मेहुणीने विटंबना केल्याचा आरोप करत मलिकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेहुणी तसेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र आता क्रांती रेडकर यांच्या बहिणीच्या वकिलाने गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर हिची बहीण आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केलं होतं.नंतर आता समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नवाब मलिक आणि निशांत वर्मा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४-ड, ५०३ यासह स्त्रियांचं अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा-१९८६ च्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय म्हणाले होते नवाब मलिक? नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर दाऊद वानखेडे तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

यासंदर्भात नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अवश्य द्यावं लागेल, कारण या प्रकरणातील खटला पुण्यातील कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तसेच खालील कागदपत्रे त्याचा पुरावा आहे.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकPoliceपोलिसMumbaiमुंबईTwitterट्विटरKranti Redkarक्रांती रेडकर