जोधा-अकबरप्रकरणी संभाजी भिडे यांचे वाॅरंट रद्द, जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 10:21 PM2022-01-27T22:21:40+5:302022-01-27T22:24:31+5:30

Sambhaji Bhide's warrant cancelled : मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे आदेश

Sambhaji Bhide's warrant cancelled in Jodha-Akbar case, bail granted | जोधा-अकबरप्रकरणी संभाजी भिडे यांचे वाॅरंट रद्द, जामीन मंजूर

जोधा-अकबरप्रकरणी संभाजी भिडे यांचे वाॅरंट रद्द, जामीन मंजूर

Next

सांगली : शहरात २००८ मध्ये ‘जोधा-अकबर’ या चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणातील संशयित शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे पकड वाॅरंट रद्द करत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. भिडे यांच्यासह माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील व अन्य ७० जणांचेही पकड वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांनी रद्द केले.

सांगली शहरात २००८ मध्ये जोधा-अकबर चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद झाला होता. हा चित्रपट हिंदूविरोधी व हिंदूंच्या भावना दुखावणारा असल्याचे कारण देत शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी दंगल घडवली होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.


या घटनेनंतर संभाजी भिडे, नितीन शिंदे, बजरंग पाटील, सुनीता मोरे यांच्यासह सुमारे ९७ जणांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीला संशयित गैरहजर राहात असल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी केस्तीकर यांनी काही संशयितांविरुद्ध पकड वॉरंट तर काहीजणांविरुद्ध जामीनपात्र वाॅरंट काढले होते.

न्यायालयाने भिडे यांना १५ हजार रुपये जातमुचलक्यावर वॉरंट रद्द करत जामीन मंजूर केला. माजी आमदार नितीन शिंदे यांना २०० रुपये दंड केला तर बजरंग पाटील व सुनीता मोरे व इतर दोघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची कॅश सिक्युरिटी भरण्याचे आदेश देण्यात आले. १ फेब्रुवारी रोजी त्यांनी जामीन घेऊन पुन्हा न्यायालयात हजर राहायचे आहे.

या प्रकरणातील संशयितांना न्यायालयाकडून वाॅरंट बजाविण्यात आल्यानंतर संभाव्य अटक टाळण्यासाठी ७० संशयितांनी न्यायालयात हजर होत वाॅरंट रद्दसाठी अर्ज सादर केला होता. संशयितांतर्फे ॲड. शैलेंद्र पाटील, ॲड. नामदेव पाटील आदींनी अर्ज दाखल केले. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून नीलिमा साबळे यांनी काम पाहिले.

Web Title: Sambhaji Bhide's warrant cancelled in Jodha-Akbar case, bail granted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.