शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

फ्लॅट विक्रीच्या व्यवहारप्रकरणी चार कोटींचा चुना; आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 20:39 IST

पोलिसांनी अन्य आरोपीची शोध मोहीम सुरु केली आहे.

ठळक मुद्देखाजगी बँकेला गंडा घालणाऱ्या प्रकाश हिराराम मारूला (३२) अटक करण्यात आलेली आहे. वांद्रे पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४०६,४२०,४६५,४६८,४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

मुंबई - बनावट दस्तावेजाच्या आधारावर घर खरेदी-विक्रीचा व्यवहारप्रकरणी खाजगी बँकेला गंडा घालणाऱ्या प्रकाश हिराराम मारूला (३२) अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी अन्य आरोपीची शोध मोहीम सुरु केली आहे. प्रकाश हा मीरारोड पूर्व येथे राहणार आहे. अटक आरोपी प्रकाश मारू याच्या बँक खात्यात २० लाख रुपये तर अन्य आरोपींपैकी हार्दिक नितीन गोठी याच्या बँकेच्या खात्यात ४० लाख रुपये वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणात तक्रारदार हे वांद्रे परिसरात राहणारे असून त्यांच्या मालकी हक्काची असलेला आलिशान फ्लॅट त्यांनी विक्रीसाठी काढला होता. त्याकामासाठी तक्रारदार यांचा मित्र अरिफ सय्यद याला त्यांनी सांगितले. आरिफ आणि इस्टेट एजंट यांना तक्रारदार यांनी माहिती दिली.  साधारण जून २०१७ मध्ये आरिफ सय्यद याच्या ओळखीचा इसम असलेल्या अब्दुल्ला खान उर्फ पप्पू याने तक्रारदार यांना संपर्क साधला आणि सांगितले की, त्याचा मित्र नरेंद्र अगरवाल याला हा फ्लॅट घेण्यात रस आहे. तसेच पप्पू तक्रारदाराकडे त्यासारख्या राहत्या घरी अगरवालला घेऊन गेला. त्यावेळी हा फ्लॅट ५ कोटी ४२ लाख रुपयांना विकण्याचे ठरले. त्यावेळी फ्लॅट खरेदीस इच्छुक असलेल्या नरेंद्र अगरवाल याने रक्कम जास्त असल्याने बँकेचे कर्ज घ्यावे लागेल असे सांगितले.

त्यावेळी नरेंद्र यांचा मित्र राकेश चक्रवर्ती याने बँकेतून कर्ज काढून देण्याची तयारी दाखविली. फ्लॅटच्या खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करून करारनामा करू असे सांगून टोकण म्हणून १० लाखाची रक्कम तक्रारदार यांना द्यावी असा व्यवहार ठरला. उर्वरित रक्कम ५ कोटी ३२ लाख रुपये कर्ज काढून देण्याचा निश्चित केले. आणि कर्जाची प्रक्रिया सुरु झाली. २० जूनला राकेशने १० लाखाची रक्कम बँकखात्यावर ट्रान्स्फर केली. त्यानंतर घरविक्रीचं अनोंदणीकृत करारनामा करण्यात आला. राकेशने बँकेने ४ कोटी ११ लाख रुपये कर्ज मंजूर केल्याचे सांगितले. काही रक्कम कमी असल्याने व्यवहार रद्द करा असा सूर तक्रारदाराने काढला. त्यावेळी उर्वरित रक्कम दिल्यानंतर ही रक्कम मिळताच कॅन्सलेशन डिड करण्याचे सांगितले. तक्रारदाराने विश्वास ठेवून नऊ ब्लॅक चेक घेतले आणि राकेश चक्रवती याला दिले. यावेळी दलाली म्हणून पप्पूला ८ लाख ८० हजाराचे तीन धनादेश दिले. बँकेत ४ कोटी पाच लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम जमा होताच राकेशने मारबलेक्स सिटी इन्फ्राचे अब्दुल्ला खान उर्फ पप्पू, विदेही डायकेम, प्रकाश हिराराम, वैदेही सहकारी पेठ, राकेश चक्रवर्ती यांचे श्री साई सी फूड्स, हार्दिक नितीन गोठी, नरेंद्र अगरवाल, खाते क्रमांक ००२००००२४९४३५ आणि चामुंडा इंटरप्राईझेस या नऊ बँक खात्यात चार कोटी पाच लाख रुपये वळविण्यात आले आणि तक्रारदार असलेल्या घरमालकाला गंडा घालण्यात आला. तक्रारदाराने या व्यवहारानंतर राकेशला फोन करून फ्लॅटचे कागदपत्र मागितले. तेव्हा सर्व कागदपत्र पैसे परत केल्यानंतर घेऊन येतो असे सांगितले.

राकेशने वकिलामार्फत पत्रव्यवहार करून सोसायटीला तक्रारदाराचा फ्लॅट त्याने खरेदी केल्याचे सांगून त्याचे मेंटेनन्स आणि इतर शेअर सर्टिफिकेट हे नावावर करण्याची विनंती केली. याबाबत माहिती मिळताच तक्रारदार असलेल्या घरमालकाला धक्काच बसला. सोसायटीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीएनबी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे लोक घरी आले. फ्लॅटचे कागदपत्र त्यांच्या नावावर असल्याने कर्ज न भरल्यास फ्लॅटवर कारवाईचे संकेत दिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४०६,४२०,४६५,४६८,४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात पोलिसांनी प्रकाश मारू याला अटक केली आहे. अन्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसMumbaiमुंबई