शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या प्रियकराची एन्ट्री झाली अन् साहिल बनला हैवान; 'तिच्या' हत्येचे रहस्य उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:53 IST

अल्पवयीन मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत संपर्कात होती असा संशय साहिलला होता

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली. साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षीय मुलीची चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. त्यात आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. आता मुलीच्या हत्येच्या तपासातून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडत आहेत. मागील काही दिवसांपासून मुलगी तिच्या आधीच्या प्रियकराशी संपर्कात आली होती. त्यावरून साहिलसोबत तिचे भांडण सुरू होते. याच भांडणातून साहिलने तिची हत्या केल्याचे बोलले जाते. 

काय आहे प्रकरण?दिल्लीच्या शाहबाद डेअरी येथे २० वर्षीय साहिलने १६ वर्षीय मुलीची हत्या केली. या मुलाने क्रूररित्या मुलीला संपवले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यात साहिल कशाप्रकारे चाकूने मुलीवर वार करत असून त्यानंतर दगडाने ठेचून हत्या करत असल्याचे दिसत आहे. 

का केली हत्या?दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत संपर्कात होती असा संशय साहिलला होता. इतकेच नाही तर साहिल आणि त्या मुलीमध्ये भांडणही झाले होते. यावेळी साहिलने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत बोलायची. त्याच्याशी संबंध ठेवत होती. त्यामुळे साहिल आणि मुलीमध्ये वाद व्हायचे. 

जून २०२१ पासून दोघे रिलेशनमध्ये होते साहिल आणि अल्पवयीन मुलगी जून २०२१ पासून रिलेशनमध्ये होते परंतु काही दिवसांपासून साहिलसोबत तिने बोलायचे बंद केले होते. या दोघांमध्ये वाद सुरू होता. मुलीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते. पण साहिल सातत्याने तिला भेटायचा प्रयत्न करायचा. शनिवारी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर साहिलने तिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. मुलीच्या हातावर प्रविण नावाचा टॅटू होता. साहिल आणि तिच्या भांडणाचे प्रमुख कारण तेच होते. 

कोण आहे साहिल?साहिल हा शाहबाद डेअरी इथं त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात ३ बहिण, आई-वडील आहेत. साहिल मॅकेनिक होता तसेच एसी, फ्रिज दुरुस्त करायचा. साहिलच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून त्याचे दारूप्रेम सर्वश्रुत आहे. कधी हुक्का पिताना तो रिल बनवायचा. हत्येनंतर साहिल फरार झाला होता. परंतु त्याला बुलंदशहरातून पोलिसांनी अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी