शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! "साहिलने रागाच्या भरात नाही तर कट रचून केली हत्या; 3 दिवस बनवत होता प्लॅन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 11:38 IST

एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची सार्वजनिक ठिकाणी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली होती. या घटनेत रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

दिल्लीतील शाहबाद डेअरी भागातील रस्त्यावर एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची सार्वजनिक ठिकाणी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली होती. या घटनेत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. या 16 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या ही रागाच्या भरात नाही तर कट रचून केली असल्याचं तपासात सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा वाद हा रागाच्या भरात झालेला नाही. ही पूर्वनियोजित हत्या होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 20 वर्षीय तरुण मुलगी राहत असलेल्या गल्लीत थांबला होता. सार्वजनिक शौचालयातून ती बाहेर आल्यावर आरोपी तरुणीसमोर आला. यानंतर त्याने मुलीवर चाकूने अनेक वार केले आणि तिला दगडाने ठेचलं. पण तेथून जाणाऱ्या लोकांनीही मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

हत्येसाठी वापरलेला चाकू साहिलने हरिद्वारमधून विकत घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, मात्र तो कधी आणि का विकत घेतला हे स्पष्ट झालं नाही. विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक म्हणाले, "साहिलने पोलिसांना सांगितले की गुरुवारी झालेल्या भांडणानंतर त्याने मुलीवर राग व्यक्त केला होता, जिथे मुलीने त्याचा अपमान केल्याचा आरोप आहे." पाठक पुढे म्हणाले, 'ही पूर्वनियोजित हत्या होती. आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही एक मजबूत केस तयार करत आहोत.

"अजिबात पश्चाताप नाही, ती मला इग्नोर करायची म्हणून..."; साहिलची कबुली    

आरोपी साहिलने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं त्याने म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपल्याला गुन्हा केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे. साहिलने सांगितले की, घटनेच्या वेळी तो खूप संतापला होता. यामागचे कारण असेही आहे की, अनेक दिवसांपासून मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मुलीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच तिने साहिलपासून दूर व्हायला सुरुवात केली, त्य़ाला हे सहन होत नव्हतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस