शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून मोठ्या भावाने घातला धाकट्या भावावर कुऱ्हाडीने घाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 23:13 IST

धानवड येथील घटना, याप्रकरणी सोमवारी रात्री साडे आठ वाजता भाऊ, वहिणी व पुतण्या अशा तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देया वादात तिघांपैकी कोणीतरी खिशातील १० हजार रुपये काढून घेतले. मोठा भाऊ गोरख हा धानवड येथे वास्तव्याला आहे. २००६ मध्ये वडीलांचे निधन झाले आहे. गावातील सात एकर शेती दोन वर्षापासून स्वत: कसत असून उर्वरित शेती मोठा भाऊ करीत आहे.

जळगाव : शेतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता धानवड, ता.जळगाव येथे घडली.  या हल्ल्यात जितेंद्र नाटू पाटील हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मोठा भाऊ गोरख नाटू पाटील, पत्नी शोभाबाई व मुलगा पवन या तिघांविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, जितेंद्र पाटील हे डोमगाव येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. मोठा भाऊ गोरख हा धानवड येथे वास्तव्याला आहे. २००६ मध्ये वडीलांचे निधन झाले आहे. गावातील सात एकर शेती दोन वर्षापासून स्वत: कसत असून उर्वरित शेती मोठा भाऊ करीत आहे. गेल्या काही दिवसापासून दोन्ही भावांमध्ये किरकोळ वाद सुरु आहेत. जितेंद्र पाटील हे पत्नीला सोबत घेऊन शेतात मक्याची लागवड करीत असताना तेथे मोठा भाऊ गोरख, त्याची पत्नी शोभा व मुलगा पवन आले होते. तुम्ही येथे कशी काय पिकाची लागवड करीत आहेत, असे म्हणत जितेंद्र यांच्या हातावर कुऱ्हाडीने घाव घातला, त्यानंतर शोभाबाई व पवन यांनीही मारहाण केली. या वादात तिघांपैकी कोणीतरी खिशातील १० हजार रुपये काढून घेतले. यावेळी नंदलाल पाटील व विनोद पाटील यांनी धाव घेऊन जितेंद्र पाटील यांना शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. याप्रकरणी सोमवारी रात्री साडे आठ वाजता भाऊ, वहिणी व पुतण्या अशा तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव