सैफ अली खानवरील हल्लेखोराला पाच दिवसांची पोलीस कोठडी; बांगलादेशी की नाही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:34 IST2025-01-19T16:34:20+5:302025-01-19T16:34:36+5:30

सैफअली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानात घुसून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अखेर ७२ तासाने आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

Saif Ali Khan's attacker remanded in five-day police custody; Bangladeshi or not... | सैफ अली खानवरील हल्लेखोराला पाच दिवसांची पोलीस कोठडी; बांगलादेशी की नाही....

सैफ अली खानवरील हल्लेखोराला पाच दिवसांची पोलीस कोठडी; बांगलादेशी की नाही....

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला आज अटक करण्यात आली. या आरोपीला आज दुपारी बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले. या आरोपीला पोलिसांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असून हिंदू नाव घेऊन वावरत होता असे समोर आले आहे.

 खार पोलिसांनी आरोपी  मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (30) याची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. परंतू कोर्टाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. शहजाद हा ठाण्याच्या हिरानंदानी भागात राहत होता. 

शहजादच्या वकिलांनी तो बांगलादेशी नसून तो भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. तर सरकारी वकिलांनी तो बांगलादेशी असून तो कोणत्या उद्देशाने भारतात घुसलेला याची चौकशी करायची असल्याचे म्हटले आहे. 

हल्लेखोर बांगलादेशी असल्याचे समजताच भाजपाने राज्यात अनधिकृतरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडण्याची मागणी केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे. 

बॉलिवूड अभिनेता सैफअली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानात घुसून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अखेर ७२ तासाने आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ठाण्याच्या कासारावडली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे.  चौकशीत त्याच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे हाती लागले नसून तो बांगलादेशी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

Web Title: Saif Ali Khan's attacker remanded in five-day police custody; Bangladeshi or not...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.