Saif Ali Khan: फिंगरप्रिंट्समुळे गुंता वाढला; CID च्या रिपोर्टमुळे मुंबई पोलिसांना दिला झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 11:48 IST2025-01-26T11:45:08+5:302025-01-26T11:48:10+5:30
Saif Ali Khan news: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. सीआयडीने एक रिपोर्ट दिला आहे, ज्यामुळे नवा गुंता निर्माण झाला आहे.

Saif Ali Khan: फिंगरप्रिंट्समुळे गुंता वाढला; CID च्या रिपोर्टमुळे मुंबई पोलिसांना दिला झटका
Saif ali khan Case New Updates: अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या शरीफुल इस्लाम शहजाद याच्या बोटाचे ठसे मुंबई पोलिसांनी सीआयडीकडे पाठवले होते. सैफ अली खानच्या घरात आढळलेले हल्लेखोराच्या बोटांचे ठसे आणि शरीफुलचे ठसे जुळत नसल्याचा रिपोर्ट सीआयडीने मुंबई पोलिसांना दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास हल्ला झाला होता. मुंबई पोलिसांनी शरीफुल याला ठाण्यातून अटक केली. सध्या त्याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. पण, सीआयडीच्या रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
बोटांचे ठसे वेगवेगळे
सैफ अली खानच्या घरात हल्लेखोराच्या बोटांचे १९ ठसे आढळून आले होते. त्याचे नमुने आणि आरोपी शरीफुल यांच्या बोटांचे ठसे मुंबई पोलिसांनी सीआयडीला पाठवले होते. सीआयडीच्या लॅबमध्ये याची तपासणी झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने रिपोर्ट पाठवला असून, सैफ अली खानच्या घरात आढळून आलेले १९ ठसे आणि अटकेत असलेल्या व्यक्तीचे ठसे जुळून आले नाहीत. सैफच्या घरात आढळून आलेले बोटांचे ठसे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सैफवर कोणी हल्ला केला, याबद्दलचा गुंता वाढला आहे.
सैफच्या घरात १९ बोटांचे ठसे आढळल्यानंतर पोलिसांनी शरीफुलच्या दहा बोटांचे ठसे सीआयडीकडे पाठवले होते. घरात आढळलेल्या एकाही ठशाशी शरीफुलच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत. पोलिसांनी हा रिपोर्ट आता पुण्यातील सीआयडीच्या पोलीस अधीक्षकांना पाठवला आहे.
सीआयडीच्या रिपोर्टमुळे संपूर्ण तपासालाच वेगळे वळण मिळाले आहे. या हल्ल्यात एकापेक्षा जास्त आरोपींचा सहभाग आहे का? अशी शंका पोलिसांना आहे. त्यादृष्टीनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे.