शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
3
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
4
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
5
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
6
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
7
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
8
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
9
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
10
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
11
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
12
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
14
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
15
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
16
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
17
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
18
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
19
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
20
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...

Sachin Vaze : सचिन वाझे यांना घेऊन NIA ची टीम पोहचली ठाण्यातील घरी;  'त्या' बॅगेत काय दडलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 20:56 IST

Sachin Vaze : या टीममध्ये एक महिला अधिकारी देखील आहे. तसेच आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास NIA ची दुसरी टीम वाझेंना मुंबईतुन ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले.   

ठळक मुद्देमाहीम खाडीजवळ वाझेंना गाडीतून खाली उतरून NIA चे सुप्रिडेंट विक्रम खलाटे आणि टीमने काही प्रश्न विचारले. त्यानंतर वांद्रे परिसरातून थेट NIA ची दुसरी टीम वाझेंनी घेऊन ठाण्याकडे साकेत कॉम्प्लेक्स येथे पोहचली आहे.  

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली, या प्रकरणात सध्या NIA कडून तपास सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. NIA ने सचिन वाझे यांना शनिवारी १२ तासांच्या चौकशीनंतर अटक केली.सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे, NIA तपासाची जोरदार चक्रे फिरवली आहेत. ठाण्यातील वाझे यांचे घर असलेल्या साकेत कॉम्प्लेक्समध्ये NIA अनेकदा तपासासाठी जात आहे. आज देखील दुपारच्या सुमारास ८ जणांची टीम तेथे धडकली. या टीममध्ये एक महिला अधिकारी देखील आहे. तसेच आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास NIA ची दुसरी टीम वाझेंना मुंबईतुन ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले.   

 

NIA चे ८ अधिकारी दोन इनोव्हातून सचिन वाझे यांच्या घरी साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले. आत गाड्या उभे केल्या. या NIA च्या चमूत एक महिला अधिकारी देखील उपस्थित होती. या आठ जणांपैकी एकजण बॅग घेऊन कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करताना आढळून आलं असून त्या बॅगेत नेमकं काय होतं याचा खुलासा अजून झालेला नाही. NIA टीम घरात वझे कुटुंबियांशी मनसुख हिरेन प्रकरणात माहिती घेत आहे. गेले अनेक तास NIA ची टीम साकेत कॉम्प्लेक्स येथे असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास मुंबईतून NIA दुसरी टीम सचिन वाझे यांना घेऊन साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचली आहे. 

 

सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास NIA ची टीम मुंबईतील कार्यालयातून सचिन वाझे यांना घेऊन बाहेर पडली. सिन रिक्रीएट करण्याच्या पार्श्वभूमीवर वाझेंनी घेऊन NIA टीम बाहेर पडली अशी चर्चा होती. मात्र, प्रथम टीम वाझेंनी घेऊन बाबुलनाथच्या दिशेने गेली. नंतर माहीम खाडीजवळ वाझेंना गाडीतून खाली उतरून NIA चे सुप्रिडेंट विक्रम खलाटे आणि टीमने काही प्रश्न विचारले. त्यानंतर वांद्रे परिसरातून थेट NIA ची दुसरी टीम वाझेंनी घेऊन ठाण्याकडे साकेत कॉम्प्लेक्स येथे पोहचली आहे.  

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाsachin Vazeसचिन वाझेMumbaiमुंबईMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानी