शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze : त्या मर्सिडीजबाबत एनआयएने केला मोठा गौप्यस्फोट, वाझेंच्या कनेक्शनबाबत दिली अशी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 23:03 IST

NIA has seized a black colour Mercedes Benz : एनआयएने आज एक मर्सिडिझ गाडीही जप्त केली आहे. तसेच ही मर्सिडिज गाडीच्या सचिन वाझेंशी असलेल्या कनेक्शनबाबतही माहिती दिली आहे. 

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी सचिन वाझेंना अटक केल्यानंतर आता एनआयएने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केले आहे. (Sachin Vaze Case) या प्रकरणात वापरण्यात आलेली इनोव्हा हस्तगत केल्यानंतर एनआयएने आज एक मर्सिडिझ गाडीही जप्त केली आहे. तसेच ही मर्सिडिज गाडीच्या सचिन वाझेंशी असलेल्या कनेक्शनबाबतही माहिती दिली आहे. (NIA IG Anil Shukla Says, NIA has seized a black colour Mercedes Benz, Sachin Vaze used to drive this car )

आज संध्याकाळी ही काळी मर्सिडीज ताब्यात घेतल्यानंतर एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गाडीची कसून तपासणी केली. तसेच त्यामधून अनेक वस्तू ताब्यात घेतल्या. दरम्यान, ही मर्सिडीज पोलीस अधिकारी सचिन वाझे चालवायचे, असा गौप्यस्फोट एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांनी सांगितले की, एनआएने आज संध्याकाळी एक मर्सिडिज ताब्यात घेतली आहे. ही मर्सिडिज सचिन वाझे चालवायचे. तसेच या मर्सिडिजमधून स्कॉर्पिओची नंबरप्लेट, पाच लाख रुपये रोख रक्कम, नोटा मोजण्याची मशीन आणि काही कपडे जप्त करण्यात आले आहेत. आता ही मर्सिडीज कुणाची आहे, याचा शोध सुरू आहे, असे एनआयएचे अधिकारी शुक्ला यांनी सांगितले. 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या चौकशीत मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणातील एनआयएची चौकशी जसजशी सुरू आहे तसतशा नवीन गोष्टीही समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणातील इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए आता मर्सिडीज कारचीही चौकशी शोध घेत होती. असे म्हटले जात आहे की, ही मर्सिडीज कारही तपासणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCrime Newsगुन्हेगारी