Sachin Vaze: वाझेने दिले होते प्रसाद लाडविरुद्धचे प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 07:10 IST2021-08-22T07:09:28+5:302021-08-22T07:10:00+5:30
हप्ता वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सचिन वाझेने तक्रारदार बिमल अग्रवालला अनेक आमिषे दाखविली. त्यापैकी प्रसाद लाड विरुद्ध दाखल प्रलंबित गुन्ह्याचे काम पूर्णत्वाला न्यायचे होते. मात्र, वाझेने त्यातून नंतर हात झटकून घेतल्याचे तक्रारदाराने जबाबात म्हटले आहे.

Sachin Vaze: वाझेने दिले होते प्रसाद लाडविरुद्धचे प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्याचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हप्ता वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सचिन वाझेने तक्रारदार बिमल अग्रवालला अनेक आमिषे दाखविली. त्यापैकी प्रसाद लाड विरुद्ध दाखल प्रलंबित गुन्ह्याचे काम पूर्णत्वाला न्यायचे होते. मात्र, वाझेने त्यातून नंतर हात झटकून घेतल्याचे तक्रारदाराने जबाबात म्हटले आहे. मात्र, यातील प्रसाद लाड म्हणजे नेमके कोण हे त्याने स्पष्ट केलेले नाही.
अग्रवालच्या तक्रारीनुसार मालाड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रं.५१४/१४ हा १७ कोटींचे फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत प्रलंबित आहे. यातील आरोपी प्रसाद लाड व हणमंत गायकवाड हे राजकीय दबाव आणून तपास होऊ देत नाहीत. ती अँथनी कंपनी विरुद्ध आर्थिक फसवणुकीची तक्रार प्रलंबित आहे. याबाबत परमबीर सिंग यांची भेट घालून प्रकरण पूर्ण करून देतो, असे वाझेने आश्वासन दिले त्याबाबत तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
खंडणीचा पाचवा गुन्हा
nपरमबीर सिंह यांच्याविरुद्धचा हा खंडणीचा पाचवा तर जिलेटीन कार व मनसुख हिरेन हत्येप्रकरणी
एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे विरुद्धचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
nपरमबीर विरुद्ध यापूर्वी ठाण्यात तीन व मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.