शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

Sachin Vaze : वाझेनेच स्काॅर्पिओत ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, एनआयएच्या तपासातून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 06:33 IST

Sachin Vaze News : एनआयएच्या तपास पथकाने  यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची  सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या  नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर धमकीचे पत्र शिंदेकडून मिळविले होते

- जमीर काझी मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पार्क केलेल्या स्काॅर्पिओमध्ये निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेनेच जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र नेऊन ठेवले होते, हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासातून स्पष्ट झाले आहे. २४ फेब्रुवारीला रात्री सुरुवातीला त्याने कार पार्क केली आणि त्यानंतर पाठीमागे असलेल्या इनोव्हामधून उतरून हे कृत्य केले होते.एनआयएच्या तपास पथकाने  यासंबंधी १७ फेब्रुवारीपासून ते ५ मार्चपर्यंतच्या सर्व घटना व त्यांच्या गुन्ह्याची  सर्व संगती जुळवली आहे. गाडीत ठेवलेल्या २० जिलेटीनच्या कांड्या  नागपूरमधील एका कंपनीच्या असून, वाझेने त्या वसईतील एकाकडून, तर धमकीचे पत्र शिंदेकडून मिळविले होते,  असा उलगडा तपासाअंति झाला, स्काॅर्पिओ चालक  व जिलेटीनच्या कांड्या पुरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.वाझेच्या सांगण्यानुसार हिरेन यांनी १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड ऐरोली येथे  तांत्रिक बिघाड झाल्याचे भासवून स्काॅर्पिओ रस्त्याच्या बाजूला लावली. हिरेन यांनी मुंबईला जाऊन  गाडीची किल्ली  वाझेला दिली आणि दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यापूर्वी  वाझेने ती गाडी एकाला तेथून  घेऊन जाण्यास सांगितले. त्याने ती ठाणे, साकेत कॉम्प्लेक्समध्ये पार्क केली. १९ फेब्रुवारीला स्काॅर्पिओ पुन्हा  मुंबई पोलीस आयुक्तालयात आणून त्यानंतर पुन्हा रात्री ती नेली.  २४ फेब्रुवारीला मुंबईत आणून कारमायकल रोडवर पार्क केली. त्यावेळी मागे वाझे पांढऱ्या रंगाची इनोव्हा घेऊन होता. स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर दोघे मुलुंड टोलनाका पार करत ठाण्याच्या दिशेने गेले.काही वेळानंतर इनोव्हाची नंबर प्लेट बदलून वाझे पुन्हा आला व त्याने जिलेटीनच्या कांड्या, पत्र स्कॉर्पिओत  ठेवले व निघून गेला. बनावट नंबरप्लेट, सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिठीत नदीत फेकल्या. याबाबी तपासातून उघड झाल्या आहेत.  

हजार तासांच्या फूटेजची सूक्ष्म तपासणीतपासासाठी  एनआयए व एटीएसने सीसीटीव्ही फूटेज महत्त्वाचा आधार ठरला आहे. त्यासाठी मुंबई, ठाण्यातील सर्व प्रमुख मार्ग, नाक्यावरील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. जवळपास हजार तासांच्या फूटेजची सूक्ष्म तपासणी केली आहे. त्यातून या गुन्ह्याचा उलगडा झाला. ‘कल्चर हाउस’मध्ये झाडाझडती एनआयएच्या पथकाने गुरुवारी सकाळी गिरगाव येथील बाबुलनाथ मंदिराजवळील कल्चर हाउस या हॉटेलवर छापा टाकला. तेथील मॅनेजर देबी सेनला ताब्यात घेतले.  सोनी बिल्डिंगमधील या हॉटेलमध्ये आरोपीची बैठक झाली होती, त्यामुळे तेथील व्यवस्थापकाकडे विचारणा करण्यात येत आहे.  तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले. तपासणीवेळी १००वर गिऱ्हाईक होते, त्यांना बाहेर काढून झडती घेण्यात आली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCrime Newsगुन्हेगारी