शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

अमानुष अत्याचार! "रशियन सैन्याकडून बुचामध्ये 25 मुलींना ओलीस ठेवून बलात्कार; अनेकजणी गरोदर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 10:09 IST

Russia Ukraine War : रशियन सैन्याने बूचा शहरात टॉर्चर चेंबर तयार केले आहेत. जिथे मृतदेहांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. रशियन सैन्याने क्रूरतेचा कळस गाठला आहे. अंगावर काटा आणणाऱ्य़ा अनेक घटना आणि थरकाप उडवणारे अनेक फोटो हे सातत्याने समोर येत आहेत. युक्रेन आणि रशियामधील वाद आता आणखी चिघळला असून युद्ध पेटलं आहे. बूचा शहरात रस्त्यावर मृतदेह पडले आहेत. यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैन्याने बूचा शहरात टॉर्चर चेंबर तयार केले आहेत. जिथे मृतदेहांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्तांनी मोठा दावा केला आहे. युक्रेनच्या संसदेच्या मानवाधिकार आयुक्त ल्युडमिला डेनिसोवा यांनी "रशियन सैनिकांनी बुचामध्ये महिला आणि तरुणींवर बलात्कार केला. बेसमेंटमध्ये जवळपास 25 मुलींना ओलीस ठेवण्यात आलं होतं. रोज त्यांच्यावर बलात्कार होत होते. यातील बहुतांश मुली 14 ते 24 वयोगटातील आहेत. त्यांच्यावर मानसिक आणि शारीरीक अत्याचार केले जातात. ओलीस ठेवलेल्या मुलींमधील अनेक मुली आता गरोदर आहेत" असं म्हटलं आहे. 

रशियन सैनिक महिला आणि मुलींवर अत्याचार करत आहेत. याच दरम्यान युक्रेनमध्ये एका 10 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला असून तिला लोखंडी सळीने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच महिलांच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली जात आहे.  युक्रेनच्या खासदाराने गंभीर आरोप केला आहे. रशियन सैनिकांनी 10 वर्षांच्या मुलींवरही बलात्कार केले. महिलांच्या शरीरावर डाग केले असा आरोप युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेन्क यांनी ट्विटरवरून केला आहे. या सैनिकांनी महिला आणि मुलींच्या शरीराची अक्षरशः चिरफाड केली असून क्रूर अत्याचार केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महिलांच्या शरीरावर लोखंडी सळया तापवून डाग देण्यात आले आहेत. 

हे डाग स्वस्तिकसारखे दिसत असल्याचंही लेसिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासोबत एक फोटोही शेअर करत "रशियन सैन्य युक्रेनमध्ये लोकांची लूट, बलात्कार आणि हत्या करत होते आणि रशियाला अनैतिक गुन्ह्यांचे राष्ट्र म्हणून संबोधले" असं म्हटलं आहे. मारियूपोल, खारकीव्हनंतर आता बूचा शहर उद्ध्वस्त झालं आहे. युक्रेनमधील लोकांना त्रास देण्यासाठी बूचाच्या चिल्ड्रन हेल्थ रिसॉर्टच्या बेसमेंटमध्ये टॉर्चर चेंबर बनवलं आहे. या बेसमेंटमध्ये पाच लोकांचे मृतदेह आढळून आले असून मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मृतदेहांचे काही भयंकर फोटो आता समोर येत आहेत. युक्रेनने दावा केला आहे की रशिया बूचा शहरात नरसंहार करत आहे. आतापर्यंत 300 हून अधिक सामान्य नागरिकांना मारलं आहे. तसेच लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युक्रेनमधील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाCrime Newsगुन्हेगारी