मीरा रोड - लोकल सुटली असताना देखील ती पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाच्या जीवावर बेतले. सुदैवाने तेथे असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने बाहेर ओढले. या घटनेचे छायाचित्रण रेल्वेच्यासीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.बोरीवलीला राहणारे अनिल सहानी हे भाईंदरला शुक्रवारी कामानिमित्त आले होते. लोकल पकडण्यासाठी ते फलाट क्र. ६ वर चालले होते. सायंकाळी ४.१६ ची दादर जलद लोकल सुटलेली पाहून ती पकडण्यासाठी ते धावले. लोकलने वेग घेतला असल्याने दारवाजाचा मधला खांब धावत पकडताना त्यांच्या हातुन खांब सुटला. त्यांचा पाय दरवाजा आणि फलाटाच्या मधील अंतरात अडकुन ते खाली पडले. त्याचवेळी फलाटावर असलेल रेल्वे सुरक्षा बलाचे जवान संजय सिंह यांनी धावत जाऊन सहानी यांना बाहेर खेचले. अन्य प्रवाशी देखील मदतीला धाऊन आले. सहानी यांना वेळीच बाहेर खेचल्याने ते सुदैवाने बचावले. सहानी यांना किरकोळ दुखापत झाली होती. औषध उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. ही सर्व घटना रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
Video : हृदयद्रावक! भाईंदरमध्ये धावती लोकल पकडणे प्रवाशाच्या जीवावर बेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 20:23 IST
या घटनेचे छायाचित्रण रेल्वेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
Video : हृदयद्रावक! भाईंदरमध्ये धावती लोकल पकडणे प्रवाशाच्या जीवावर बेतले
ठळक मुद्देसुदैवाने तेथे असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने बाहेर ओढले. ही सर्व घटना रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.