अभिनेता अरबाजच्या अटकेची अफवा; चुकीची माहिती पसरविणाऱ्याला दिल्लीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 06:47 AM2020-10-17T06:47:08+5:302020-10-17T06:47:26+5:30

Sushant Singh Rajput: विभोरने टिष्ट्वटर, फेसबूक आणि यूट्यूबच्या माध्यमातून मुंबई पोलिसांसह राजकीय नेत्यांवर निशाणा साधत बदनामीचे सत्र सुरू केले

Rumors of actor Arbaaz's arrest; Man arrested for spreading false information | अभिनेता अरबाजच्या अटकेची अफवा; चुकीची माहिती पसरविणाऱ्याला दिल्लीतून अटक

अभिनेता अरबाजच्या अटकेची अफवा; चुकीची माहिती पसरविणाऱ्याला दिल्लीतून अटक

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात सोशल मीडियावर चुकीचे आरोप करून संभ्रम निर्माण करणाºया विभोर आनंद नावाच्या व्यक्तीला नवी दिल्लीतून सायबर पोलिसांनी अटक केली. तो स्वत:ला वकील असल्याचे भासवत आहे. याबाबत खातरजमा करण्यात येत आहे.

विभोरने टिष्ट्वटर, फेसबूक आणि यूट्यूबच्या माध्यमातून मुंबई पोलिसांसह राजकीय नेत्यांवर निशाणा साधत बदनामीचे सत्र सुरू केले होते. त्याच्याविरुद्ध आॅगस्ट महिन्यात एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता. समन्स जारी करून त्याला चौकशीसाठी हजर राहाण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र त्याने हजर न राहता सुशांत आणि सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन प्रकरणात आरोप करत पोलिसांसह राजकीय नेत्यांच्या बदनामीचे सत्र सुरूच ठेवले.

त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अरबाज खान, सूरज पांचोली, सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले. तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला दिल्लीतून गुरूवारी अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याला मुंबईत आणण्यात आले. मुंबई पोलिसांच्या बदनामी प्रकरणी सोशल मीडियावरील अकाउंटविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातही विभोरचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. त्याने अनेक बनावट खात्याचा यात वापर केला आहे.

अभिनेता अरबाजच्या अटकेची अफवा
विभोरने अरबाजला सुशांत, दिशा प्रकरणात सीबीआयने अटक केल्याची खोटी माहितीही यूट्यूबवर प्रसारित केली होती. त्याविरोधात अरबाजने त्याच्याविरोधात मुंबईच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी सप्टेंबरअखेरीस झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विभोरसह अन्य प्रतिवादींना समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह साहित्य काढून टाकण्याची सूचना केली होती. तरीही त्याच्याकड़ून बदनामीचे सत्र सुरू होते.

Web Title: Rumors of actor Arbaaz's arrest; Man arrested for spreading false information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.