शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

महिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्या, विष्ठा फेकणाऱ्या विकृत तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 12:56 PM

लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीट्सना विष्ठा लावून ठेवल्याचे प्रकार मध्य रेल्वेवर महिन्याभरापासून घडत होते. त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकालाही बसत होता.

मुंबईः पहाटेच्या वेळी रिकाम्या महिला डब्यात शिरून हस्तमैथुन करणाऱ्या आणि सीट्सना विष्ठा लावून ठेवणाऱ्या विकृत तरुणाला रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिनेश लक्ष्मण दुवरे (२६) असं त्याचं नाव असून तो कर्जतचा रहिवासी आहे. गेल्या महिन्याभरात दहा वेळा त्यानं हे किळसवाणं कृत्य केल्याचं चौकशीतून समोर आलंय. आनंद मिळवण्यासाठी आपण हा प्रकार करायचो, असं दिनेशनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीबद्दल शंका निर्माण झाली आहे.

लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीट्सना विष्ठा लावून ठेवल्याचे प्रकार मध्य रेल्वेवर महिन्याभरापासून घडत होते. त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकालाही बसत होता. डबा स्वच्छ केल्याशिवाय ट्रेन सोडणं शक्य नसल्यानं लोकल सेवा विस्कळीत व्हायची. हे प्रकार कोण, कसे आणि कुठे करतंय याचा शोध रेल्वे पोलीस घेत होते; पण त्यांना सुगावा लागत नव्हता. अखेर, हे घाणेरडं कृत्य करणारा दिनेश दुवरे सीसीटीव्हीत सापडला आणि पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. त्याने महिन्याभरात दहा वेळा हे प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पहाटेच्या वेळी सुटणाऱ्या लोकलमध्ये फारशी गर्दी नसते. महिला डबे तर रिकामेच असतात. त्यावेळीच दिनेश डब्यात शिरून हस्तमैथुन करायचा आणि सोबत नेलेली विष्ठा सीट्सना लावून ठेवायचा. नव्या लोकलमध्ये महिला डब्यात बसवलेल्या सीसीटीव्हीनं त्याला पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ९ सप्टेंबरला सकाळी ६.५६ वाजता तो सीएसएमटीहून बदलापूरला जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात शिरला. डब्यात कुणीही नसल्याची खात्री करून त्यानं हस्तमैथुन केला आणि नंतर सीट्सजवळ जाऊन विष्ठा पसरवून पळ काढला. या फुटेजमध्ये दिनेशचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे पोलीस त्याच्या शोधात होते. शुक्रवारी सकाळी सीएसएमटी स्थानकात उपनिरीक्षक एस बी पाटील, कॉन्स्टेबल ए डी माने, एस जी बोर्डे आणि धर्मेंद्र यांना दिनेश सापडला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, तेव्हा त्यानं आपला गुन्हा कबूल केला. 

भायखळा मार्केटमध्ये दिनेश मजुरी करतो. रात्री उशिरा तो सीएसएमटी स्टेशन परिसरात यायचा आणि तिथेच झोपायचा. त्यानंतर सकाळी रिकाम्या महिला डब्यात शिरून हे घाणेरडं कृत्य करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलCrime Newsगुन्हेगारी