शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुजलेले मृतदेह सापडले, अख्खं कुटुंब संपवलेल्या आरोपीला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:49 IST

Murder Case : पोलिसांनी एका घरातून चार कुजलेले मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येनंतर खळबळ माजली होती. पोलिसांनी या गुह्याची अवघ्या ४८ तासांत उकल केल्याचा दावा केला आहे. या हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. अहमदाबादच्या ओढव परिसरात एक महिला, तिची 15 आणि 17 वर्षांची दोन मुले आणि आजीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी एका घरातून चार कुजलेले मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.विनोद गायकवाड हा ओढव परिसरात टेम्पो चालक म्हणून काम करतो. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विनोद आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडणं होत होती. विनोदला दारूचे व्यसन आहे आणि त्याला पत्नीच्या चारित्र्यावर देखील संशय होता. कुटुंबात होत असलेल्या सततच्या भांडणामुळे त्याने घरातील सर्व सदस्यांची हत्या एकत्र केली आणि मृतदेह घरातच टाकून पळ काढला. या घटनेनंतर आरोपी सुरतला पळून गेला. त्यानंतर तो सुरतहून इंदूरला गेला. आरोपी इंदूर सोडण्याच्या प्रयत्नात असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. घटनेच्या ४८ तासांच्या आतच अहमदाबाद क्राइम ब्रँचने हत्येप्रकरणी विनोद याला अटक केली.

आरोपी आता या चारही खुनांबद्दल आपला जबाब सातत्याने बदलत आहे. हत्येच्या एकाही प्रत्यक्षदर्शीला जिवंत सोडायचं नसल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केल्याचे आरोपीने गुन्हे शाखेला सांगितले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदने पत्नी, दोन मुले आणि आजी यांची हत्या केली. विनोदने त्याच्या आजीवर यापूर्वी देखील हल्ला केला होता. मात्र, मुलीचा विचार करून सासूने या हल्ल्याची माहिती कोणालाही दिली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकGujaratगुजरात