पाथरीमध्ये चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:21 PM2018-07-17T16:21:43+5:302018-07-17T16:21:59+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील मोंढा परिसरात  मुख्य असलेल्या पाच दुकानाचे शटर तोडून चोरट्याने 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली.

In the robbery, thieves broke down five shops on the National Highway | पाथरीमध्ये चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने फोडली

पाथरीमध्ये चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने फोडली

Next

पाथरी(परभणी ) : राष्ट्रीय महामार्गावरील मोंढा परिसरात  मुख्य असलेल्या पाच दुकानाचे शटर तोडून चोरट्याने 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. एकाच रात्री मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने फोडल्याने पोलीस समोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

शहरात बाजार समितीच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर मोंढा आहे. आज पहाटे येथील मार्केटमधील तीन कृषी, एक कापड, आणि एक किराणा असे पाच दुकाने चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला. पाच दुकानातून एकूण 57 हजार 830 रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. 
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजय पामे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के व्ही बोधगिरे करत  आहेत.

Web Title: In the robbery, thieves broke down five shops on the National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.