सराफी पेढीचे शटर उचकटून दोन लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 19:14 IST2019-01-25T19:13:23+5:302019-01-25T19:14:45+5:30
सराफी पेढीचे शटर बंद असताना शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने २ लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व मुर्त्या लंपास केल्या. ही घटना गुरुवारी पहाटे दिघी येथे घडली.

सराफी पेढीचे शटर उचकटून दोन लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी : सराफी पेढीचे शटर बंद असताना शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने २ लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व मुर्त्या लंपास केल्या. ही घटना गुरुवारी पहाटे दिघी येथे घडली.
मनिष चंदनमल जैन (वय २५, रा. फ्लॅट नं. ५०१, ए विंग, विशालनगरी, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जैन यांचे दिघीतील रोडे हॉस्पिटलजवळ शिवगणेश कॉलनी येथे श्री कल्याणी ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. हे दुकान शटर लावून बंद असताना गुरुवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास चोरटा शटर उचकटून आत शिरला. त्यानंतर दुकानातील चांदीचे दागिने, २० मुर्त्या व इतर भांडी असा २ लाख ४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.