शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये दारूसाठी दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडला बियर बार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:09 IST

याप्रकरणी हॉटेल मालक संतोष घोटगे (४६) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

ठळक मुद्देसांगली रोडवरील पवन्स हॉटेल चोरट्यांनी फोडले आणि ४ हजार रुपयांच्या रक्कमेसह बारमधील ४ हजार रुपयांची विदेशी दारू चोरांनी लंपास केली. या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे चोरांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून हा चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस चक्रावले आहेत. 

इचलकरंजी - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्याने मद्यविक्री करण्यास बंदी होती. त्यामुळे तळीरामांना मद्य मिळणे मुश्किल झाले होते. मात्र, यामुळे आता बंद असलेले बियर बार चोरट्यांनी टार्गेट केला आहे. सांगली रोडवरील पवन्स हॉटेल चोरट्यांनी फोडले आणि ४ हजार रुपयांच्या रक्कमेसह बारमधील ४ हजार रुपयांची विदेशी दारू चोरांनी लंपास केली. याप्रकरणी हॉटेल मालक संतोष घोटगे (४६) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

यामध्ये ब्लेंडर स्प्राईडच्या ४ बाटल्या, टुबर्ग बिअरच्या ५ बाटल्या, मॅकडॉलच्या ४ बाटल्या, मॅकडॉल रेडरमच्या ५ बाटल्या, डीएसपी ब्लॅकच्या २ बाटल्या, बडवायझरच्या ४ बाटल्या असा दारूचा साठा आणि कॅश ड्रॉव्हरमधील ४ हजारांची रोकड असा ८०१५ चा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला.लॉकडाऊन असताना सोमवारी दिवसाढवळ्या हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरी झालेल्या हॉटेलपासून हाकेच्या अंतरापासून तपासणी नाका आहे. या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे चोरांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून हा चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस चक्रावले आहेत. 

लॉकडाऊन असूनही दिवसाढवळ्या दारू चोरीची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सांगली रोडवरील यड्राव फाट्याजवळ खोतवाडी गावाच्या हद्दीत घोटगे यांच्या मालकीचे पवन्स हॉटेल आहे. या हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या लोखंडी शटर्सच्या दरावाजाचे कुलूप तोडण्यात आले असून आतील दरवाजाची काच फोडली. त्यातून आत प्रवेश करुन बारमधील महागडा दारूचा साठा चोरांनी पळविला. 

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसSangliसांगली