शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

समलिंगी संबंधातून तरुणाला लुटले; पुण्यातील सिंहगड रोडवरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 19:37 IST

फिर्यादीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तो घाबरुन गेला होता. ही बाब त्याने आपल्या एका मित्राला सांगितले़ मित्राने त्याला धीर देऊन पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले़

पुणे : समलैंगिक संबंध ठेवण्याच्या हव्यासापोटी गेलेल्या विवाहित तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील ८१ हजार  रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना धायरी येथील डीएसके विश्व ते नांदेड फाटा दरम्यानच्या एका खोलीत ९ आॅगस्ट रोजी घडला होता़ ही बाब घरात समजल्यास आपला संसार मोडेल, या भितीने या तरुणाने कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. मित्राने धीर दिल्यानंतर त्याने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हा एका गे साठींच्या अ‍ॅपवर चॅटिंग करत असताना त्याला रवी नावाच्या एकाने हाय मेसेज पाठविला़ त्याला फिर्यादीने कोठे आहे, अशी विचारणा केली़ त्यावर त्याने डीएसके रोडला असल्याचे सांगत एका ठिकाणी जागा आहे, असे सांगितले़ त्या ठिकाणी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादी गेला़ तेथे त्याला रवी नावाचा तरुण भेटला. दोघे जण एकत्र असताना तिघे चौघे तलवार, काठ्या घेऊन त्यांच्या खोलीत शिरले़ त्यांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी, दांडक्याने मारहाण केली़ तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली़त्यानंतर फिर्यादीकडील १० हजार रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या़ त्यानंतर त्यांनी गुगल पे द्वारे व एटीएमचा पिन नंबर जबरदस्तीने घेऊन त्याद्वारे पैसे काढून ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला़ 

फिर्यादीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तो घाबरुन गेला होता़ ही बाब त्याने आपल्या एका मित्राला सांगितले़ मित्राने त्याला धीर देऊन पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले़ त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे रविवारी फिर्याद दिली आहे़ गे अ‍ॅपच्या माध्यमातून कट रचून, मारहाण करुन लुटल्याचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे़ फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरुन आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे सिंहगड रोड पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे