शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओस नागरिकांनी बदडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 19:28 IST

मैत्री करण्यासाठी दबाव टाकत महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाºया युवकास कळमेश्वर येथील बसस्थानकावर नागरिकांनी चोप दिला.

नागपूर - मैत्री करण्यासाठी दबाव टाकत महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणा-या युवकास कळमेश्वर येथील बसस्थानकावर नागरिकांनी चोप दिला. यानंतर नागरिकांनी त्याला पोलीसांच्या स्वाधीन केले. संदीप निंबुरकर (२५) रा.गोधणी, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  ही विद्यार्थिनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील राहणारी आहे. ती नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जुलै रोजी कळमेश्वर बसस्थानकावर या युवकाने संबंधित मुलीला मैत्री करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी तिने त्यास नकार दिला होता. गुरुवारी ही मुलगी नेहमीप्रमाणे नागपूर येथे महाविद्यालयात जाण्याकरीता कळमेश्वर बस स्थानकावर उभी होती. त्यावेळी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान संदीपने तिला पुन्हा गाठले. त्याने पुन्हा एकदा या मुलीला मैत्री करण्याचा आग्रह केला. यावर तिने मी आपल्याला ओळख नसल्याने मैत्री करणार नसल्याचे सांगितले. यावर त्याने भडकत मुलीला अश्लील शिविगाळ केली. हा प्रकार बसस्थानकावर उभ्या असलेल्या नागरिकांनी पाहिला. नागरिकांनी युवकाला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. यानंतर त्याला कळमेश्वर येथील पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.नागरिकांनी पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावर पोलिसांनी आरोपी संदीप विरुद्ध भांदविच्या कलम ३५४ (ड), २९४ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सुशील धोपटे करीत आहे. बसस्थानकावरील काही नागरिकांनी या घटनेचे व्हीडोओ शुटींग केले. यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला. व्हिडीओ व्हायरल होताच झालेल्या प्रकाराची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे. अशा युवकांना याच पद्धतीने धडा शिकविणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर