सीबीआयकडून रियाच्या वडिलांची तिसऱ्या दिवशी झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 03:57 AM2020-09-04T03:57:46+5:302020-09-04T03:58:09+5:30

रियाचे वडील इंद्रजीत गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा डीआरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये पोहोचले. त्यांच्याबरोबर सिद्धार्थ पिठानीचीही चौकशी करण्यात आली.

Riya's father' Inquiry on the third day by the CBI | सीबीआयकडून रियाच्या वडिलांची तिसऱ्या दिवशी झाडाझडती

सीबीआयकडून रियाच्या वडिलांची तिसऱ्या दिवशी झाडाझडती

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष पथकाकडून सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी सुरूच आहे. सलग तिसºया दिवशी त्यांच्याकडे आठ तास चौकशी करण्यात आली असून रिया, शोविकच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत विचारणा करण्यात आली.
रियाचे वडील इंद्रजीत गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा डीआरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये पोहोचले. त्यांच्याबरोबर सिद्धार्थ पिठानीचीही चौकशी करण्यात आली. सुशांत, रियाचे संबंध, त्यांच्यातील वाद, ड्रग्ज सेवनाबद्दल त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा रिया, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग, श्रुती मोदी यांना समोरासमोर बसून विचारणा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

चक्रवर्ती कुटुंबाची एनसीबीकडून होणार चौकशी
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या रिया व तिचा भाऊ शोविकला चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या अनुषंगाने सीबीआयचा बहुतांश तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

ड्रग्ज तस्कर जैद याला
९ सप्टेंबरपर्यंत कोठडी
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूसंबंधी व बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनमधील महत्त्वाचा दुवा ठरणारा तस्कर जैद विलातीला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे.
रियाचा भाऊ शोविक हा संपर्कात असल्याची कबुली त्याने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य सहा आरोपींकडेही चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने नार्कोट्रिक्स कंट्रोल बोर्ड (एनसीबी) गेल्या दहा दिवसांपासून मुंबईत तपास करत आहे. ड्रग्ज पेडलर जैद विलाती हा बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात उत्तेजक पदार्थ पाठविणाऱ्यांपैकी एक तस्कर असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे त्याच्याकडे कसून चौकशी केल्यास बॉलीवूडमधील अनेक बडी नावेही उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुशांतच्या मृत्यूच्या अनुषंगाने तपास करणे आवश्यक असल्याचे एनसीबीच्या अधिकाºयांनी गुरुवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे कोर्टाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Riya's father' Inquiry on the third day by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.