रिलायन्स कंपनीच्या मॅनेजरचा अपहरणाचा प्रयत्न ; तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:29 IST2019-05-27T22:28:53+5:302019-05-27T22:29:06+5:30
अपहरण करताना तिघांनी ऐरोली येथे सोडून दिल्याचे शहा यांनी सांगितले. त्यानंतर शहा यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

रिलायन्स कंपनीच्या मॅनेजरचा अपहरणाचा प्रयत्न ; तिघांवर गुन्हा दाखल
पनवेल : जामनगर ते नागोठणे मिथेन गॅसच्या वाहिनी प्रकल्पाचे पाहणारे व्यवस्थापक हितेन शहा यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाडा येथील तिघांवर खारघर पोलीस ठाण्यात सोमवारी अपहरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅसवाहिनी वाडा याठिकाणाहून जाते येथील एका शेतक-यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात तुषार सावंत, मोहन सावंत व पी.टी.सावंत हे या प्रकल्पाचे व्यवस्थापक हितेंन शहा यांना विचारण्यासाठी खारघर मध्ये आले होते. यावेळी तिघांनी शहा यांना आपल्या गाडीत बसवून आपला अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे शहा यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . अपहरण करताना तिघांनी ऐरोली येथे सोडून दिल्याचे शहा यांनी सांगितले. त्यानंतर शहा यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली . याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत . तिघेही आरोपी फरार आहेत .