शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सिगारेट विकणाऱ्या महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 19:45 IST

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅन्ड भागात शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेट आदीची विक्री करत होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मध्यरात्रीनंतर एका ३० वर्षीय महिलेस मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी रिक्षा चालकास गुन्हे शाखेने १२ तासात अटक केली आहे . आरोपीला २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत . 

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅन्ड भागात शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेट आदीची विक्री करत होती . त्यावेळी अनोळखी रिक्षा चालकाने सर्व सिगारेट विकत घेण्याच्या बहाण्याने त्या महिलेस रिक्षात बसवले . तिला जबरदस्तीने केबिन - फाटक रोडच्या अंधाऱ्या गल्लीत नेले . तेथे तिला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला . या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकांत सागर व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख , सहायक निरीक्षक नितीन बेंद्रे , कैलास टोकले , पुष्पराज सुर्वे सह वाडीले , संजय शिंदे , प्रशांत विसपुते , सचिन सावंत , मनोहर तावरे , राजवीरसिंग संधू , प्रवीणराज पवार , सतीश जगताप , बाळासाहेब गर्जे, सुशील पवार , समीर यादव , सनी सूर्यवंशी यांच्या पथकाने विविध दिशेने तपास सुरु केला . 

आरोपी रिक्षा चालकाची कोणतीच माहिती नसल्याने पोलिसांनी चौकशी व खबऱ्यांसह तांत्रिक विश्लेषण , सीसीटीव्ही फुटेज आदींच्या मदतीने रिक्षाचा क्रमांक आणि मालक शोधून काढला . त्याची चौकशी केल्यावर त्या रात्री  रिक्षा चालवणारा अनिल कुमार उर्फ कुंदन ओमप्रकाश मिश्रा ( २८) रा . इंदिरा नगर, नवघर , भाईंदर पूर्व हा असल्याचे निष्पन्न झाले . गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षा चालक आरोपीला रविवार सप्टेंबर रोजी अटक केली . 

गेल्याच महिन्यात शिकवणी साठी जाणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अभद्र वर्तणूक करणाऱ्या रिक्षा चालक  कृष्णकुमार बलदेव मौर्या ( ४६) रा . एव्हरग्रीन सिटी, जीसीसी क्लब जवळ , मीरारोड ह्याला अटक करण्यात आली होती . त्यावेळी मुलीने घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारली होती .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर