उल्हासनगरात क्षुल्लक कारणावरून मेहुण्याची रिक्षा व मोटरसायकल जाळली, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: October 2, 2022 17:04 IST2022-10-02T17:03:09+5:302022-10-02T17:04:40+5:30

उल्हासनगर लालचक्की चौक परिसरात बापू फर्नाडिस यांचे तर भाटिया चौकात विजय पुजारी याचे इलेक्ट्रिकल दुकान आहे.

rickshaw and motorcycle were burnt for small reason in Ulhasnagar | उल्हासनगरात क्षुल्लक कारणावरून मेहुण्याची रिक्षा व मोटरसायकल जाळली, गुन्हा दाखल

उल्हासनगरात क्षुल्लक कारणावरून मेहुण्याची रिक्षा व मोटरसायकल जाळली, गुन्हा दाखल

उल्हासनगर - मेहुण्या सोबतच्या क्षुल्लक भांडणाच्या कारणावरून शनिवारी रात्री दोन मोटरसायकली व रिक्षा ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्याचा प्रकार लालचक्की चौकात घडला. सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी विजय पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

उल्हासनगर लालचक्की चौक परिसरात बापू फर्नाडिस यांचे तर भाटिया चौकात विजय पुजारी याचे इलेक्ट्रिकल दुकान आहे. पुजारी याचा बापू फर्नांडिस मेहुणा असून शनिवार त्यांच्यात बाचाबाची झाली होती. या क्षुल्लक भांडणाच्या रागातून विजय पुजारी याने मेहुणा फर्नाडिस याने लालचक्की चौकात पार्किंग केलेली रिक्षा, स्कुटी मोटरसायकल व अज्ञात मोटरसायकल यांच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. याप्रकारने खळबळ उडाली असून चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे विजय पुजारी यांचे गैरकृत्य उघड झाले. पोलिसांनी विजय पुजारी यांचे घर गाठले असता, रविवारी सकाळी ७ वाजाता विजय घरातून बाहेर गेल्याची माहिती मिळाली. 

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी विजय पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस विजय पुजारी याचा शोध घेण्यात येत असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 

Web Title: rickshaw and motorcycle were burnt for small reason in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.