शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रियाची ईडीकडून ९ तास झाडाझडती, फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 06:45 IST

फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली कुठून? मॅनेजर श्रुतीही चौकशीच्या घेऱ्यात

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गायब झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अखेर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाली. ईडीने रियाकडे सुशांतच्या खात्यातील १५ कोटींच्या व्यवहारांबाबत ९ तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे सुशांत आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांकड़ून चौकशी सुरू आहे.

बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. गुरूवारी ईडीने रियाला समन्स बजाविले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने वकीलामार्फत केली होती. ईडीने ती फेटाळली आणि चौकशीसाठी हजर न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करताच, शुक्रवारी रिया चौकशीसाठी सकाळी ११.५५ वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी तिचा भाऊ शोविकही तिच्यासोबत होता.रियाचे खार आणि नवी मुंबईत दोन फ्लॅट आहेत. यापैकी खार येथील फ्लॅट तिने २०१८ मध्ये आई आणि स्वत:च्या नावावर खरेदी केला. त्याची किंमत ७६ लाख असून, अन्य कर धरुन हा फ्लॅट ८० लाखांवर गेला आहे. मात्र सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वी तिने यात गुंतवणूक केल्याचे समजते. तसेच आतापर्यंत ४५ टक्के पैसे तिने दिल्याचेही संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर विशाल जाधव यांनी सांगितले. मात्र रियाचे वार्षिक उत्पन्न १० ते १४ लाख असताना तिने एवढी गुंतवणूक कशी आणि कुठून केली? याबाबतही ईडी अधिक तपास करत आहेत. विविध कंपनीबाबत, तसेच सुशांतकडून आतापर्यंत किती पैसे घेतले? अशा ५० प्रश्नांबाबत ईडी चौकशी करत आहे. तिच्याकडे गेल्या पाच वर्षांत आयटीआर, बँक स्टेटमेंट मागण्यात आले आहे. मात्र कागदपत्रे नसल्याने तिने वकिलांमार्फत संबंधित कागदपत्रे पाठविणार असल्याचे सांगितले.दरम्यान, सुशांतची माजी मॅनेजर आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदीनेही ईडीच्या समन्सनुसार दुपारी दोन वाजता कार्यालय गाठले. तिचीही चौकशी करण्यात आली. श्रुतीनंतर सुशांतचा मित्र आणि त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याची शनिवारी चौकशी होणार आहे. त्यालाही ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहेत.नवी मुंबईतील कंपनीची झाडाझडतीपार्टनरशीपमध्ये सुशांतने ३ कंपन्या सुरू केल्या. यात नवी मुंबईतील सुशांत, रिया, शोविकने तयार कलेल्या विविड्रेज रिआलिटी कंपनीकडे ईडीने लक्ष केंद्रित केले आहे. या कंपनीसाठी वापरलेले कार्यालय रियाचे वडील इंद्रजीत यांच्या नावे आहे. तसेच रियाने या कंपनीचे नावही बदलल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Sushant Singhसुशांत सिंगCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस