Lucknow Crime News: दहा वर्षापूर्वी एका व्यक्तीने आईचा अपमान केला होता. तिला मारहाण केली होती. हे सगळं त्या महिलेचा मुलगा पाहत होता. मुलाने सगळं डोक्यात ठेवलं होतं, बदला घेण्यासाठी त्या मुलाने १० वर्षे वाट पाहिली. अन् वेळ मिळताच त्या व्यक्तीची हत्या केली. हे सगळ वाचून तुम्हाला एका हिंदी चित्रपचाटी स्टोरी वाटली असेल पण ही सत्य घटना आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील लखनौमधील आहे.
लखनौ येथील सोनू कश्यप हे या मुलाचे नाव आहे. तो आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मनोजच्या शोधात १० वर्षे लखनौच्या रस्त्यांवर फिरत होता.
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनूचे मित्रही त्याच्यासोबत हत्येच्या कटात सामील झाले. हत्येनंतर त्यांना पार्टी देण्याचे आश्वासन देऊन. त्यांनी प्लॅन करुन नारळपाणी विकणाऱ्या मनोजची हत्या केली, पण एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांची ओळख पोलिसांना उघड झाली. या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
सोनू, रणजीत, आदिल, सलामू आणि रेहमत अली अशी आरोपींची नावे आहेत.
१० वर्षांपूर्वी, मनोजने एका वादात सोनूच्या आईला मारहाण केली होती आणि तेथून पळून गेला होता. आईच्या अपमानामुळे अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या सोनूने त्याला शोधण्यास सुरुवात केली. वेळ निघून गेला, पण त्याने हार मानली नाही. सुमारे तीन महिन्यांपूर्वी, अखेर त्याला शहरातील मुन्शी पुलिया परिसरात तो दिसला. येथूनच त्याने बदला घेण्याचे नियोजन सुरू केले.
लोखंडी रॉडने हल्ला
ज्या दिवशी त्याला मनोजचा पत्ता मिळाला. तेव्हापासून त्याने प्लॅन सुरू केला. मनोजचा रोजच्या दिनक्रमाची त्याने माहिती घेतली. हत्या करण्यासाठी हत्यारांची गरज होती. म्हणून त्याने त्याच्या चार मित्रांना हत्येच्या कटात सामील केले आणि हत्येनंतर त्यांना पार्टी देण्याचे आश्वासन दिले. २२ मे रोजी, दुकान बंद केल्यानंतर मनोज एकटा असताना, त्यांनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी करुन सोडले.
मनोजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असले तरी, पोलिसांना ते कुठेही सापडले नाहीत. दरम्यान, हत्येनंतर सोनू आणि त्याच्या मित्रांसाठी त्याने पार्टीची वेळ ठरवली होती. त्याने त्याच्या मित्रांसाठी एक दारू पार्टी आयोजित केली होती. सर्वांनी भरपूर मद्यपान केले आणि पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले. या फोटोंमुळे पोलिसांना आरोपी सापडले.