२५ लाखांच्या लाच प्रकरणी CBI च्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक 

By पूनम अपराज | Published: October 3, 2020 09:17 PM2020-10-03T21:17:23+5:302020-10-03T21:17:34+5:30

Bribery Case : शनिवारी दुपारी सिन्हा यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे

Retired CBI officer arrested in Rs 25 lakh bribery case | २५ लाखांच्या लाच प्रकरणी CBI च्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक 

२५ लाखांच्या लाच प्रकरणी CBI च्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अटक 

Next
ठळक मुद्देबिहारमधील चारा घोटाळ्याची चौकशी करणार्‍या टीमचा एकेकाळी भाग असलेल्या सिन्हा यांना 25 लाखांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली.

नवी दिल्ली - लाचखोरीच्या कथित आरोपात सीबीआयने नुकतीच निवृत्त पोलिस अधीक्षक एनएमपी सिन्हा यांना अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. यावर्षी ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त झालेले सिन्हा हे सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेत एसपी होते, असे माहिती मिळत आहेत. 

बिहारमधील चारा घोटाळ्याची चौकशी करणार्‍या टीमचा एकेकाळी भाग असलेल्या सिन्हा यांना 25 लाखांच्या लाच प्रकरणातअटक करण्यात आली. शनिवारी दुपारी सिन्हा यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Sushant Singh Rajput Case : सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा अंतिम अहवाल सादर 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एनएमपी सिन्हा याना पोलिसांनी अटक केली असून त्यानी कोणत्या प्रकरणात ही लाच घेतली याचा खुलासा झालेला नाही. सीबीआयकडून याची माहिती अद्याप समोर आली नाही. शनिवारी एनएम सिन्हा याना न्यायालयात हजर केल जाणार आहे. सिन्हा सीबीआयमध्ये माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे ओएसडी होते. गेल्याच महिन्यात राकेश अस्थाना याना बीएसएफचे डीजी म्हणून नियुक्त करण्यात आल आहे.

Web Title: Retired CBI officer arrested in Rs 25 lakh bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.