शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर निवृत्त बीएसएफ जवानाचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 15:12 IST

दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे़.

ठळक मुद्देसध्या ते निवृत्त झाले असून एका ठिकाणी बॉडी गार्ड म्हणून काम पाहत दारुच्या नशेत पिस्तुल काढत पत्नीच्या दिशेने गोळी झाडली़

पुणे : दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनीअटक केली आहे़.बालाजी रंगनाथ चाथे (वय ४६, रा़ सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड) असे या जवानाचे नाव आहे़ या घटनेत त्यांच्या पत्नी कडूबाई बालाजी चाथे (वय ४२) जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी चाथे हे बीएसएफमध्ये जवान म्हणून कामाला होते़. सध्या ते निवृत्त झाले असून एका ठिकाणी बॉडी गार्ड म्हणून काम पाहत होते़. त्यांना दारु पिण्याचे व्यसन आहे़. पत्नी व मुलगा त्यांना दारु पिण्यापासून परावृत्त करत होते़. शुक्रवारी दुपारी १ वाजता ते घरी आले़. त्यावेळी घरात पत्नी व त्यांचा मुलगा योगेश (वय २३) हे घरात होते़. बालाजी यांनी आल्या आल्या दारु पिण्यास सुरुवात केली़. तेव्हा पत्नी कडूबाई व मुलगा योगेश यांनी त्यांना दारु पिऊ नका असे सांगितले़. तेव्हा दारुच्या नशेत बालाजी यांनी कमरेचे पिस्तुल काढत पत्नीच्या दिशेने गोळी झाडली़. गोळी खेटून गेल्याने कडुबाई जखमी झाल्या़. गोळीबार केल्यानंतर बालाजी पळून गेले होते़ .याप्रकरणी त्यांचा मुलगा योगेश चाथे याने फिर्याद दिली आहे़. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली. बंडगार्डन पोलिसांनी बालाजी चाथे यांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक एऩ जे़ घाग तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक