देहविक्रीतून दोन पीडितांची सुटका, घराच्या वरच्या खोलीत वेश्यागृह, दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

By रवींद्र देशमुख | Updated: March 14, 2024 19:39 IST2024-03-14T19:38:44+5:302024-03-14T19:39:14+5:30

वेश्या व्यवसायावर करत होत्या उदरनिर्वाह

Rescue of two victims from prostitution, brothel in upper room of house, case registered against both | देहविक्रीतून दोन पीडितांची सुटका, घराच्या वरच्या खोलीत वेश्यागृह, दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

देहविक्रीतून दोन पीडितांची सुटका, घराच्या वरच्या खोलीत वेश्यागृह, दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

रवींद्र देशमुख, सोलापूर / पंढरपूर: लक्ष्मीटाकळी (ता. पंढरपूर) येथे एका खोलीत देहविक्री केल्याप्रकरणी पिडीत दोन महिलांची सुटका करुन दोन महिलांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, दोन महिलांनी घरांच्या वरील खाेलीत स्वत:च्या आर्थिक फायद्या करता, वेश्यागृह केले होते. वेश्याव्यवसाय करुन त्या कमाईवर उदरनिर्वाह करत होत्या. याबाबत पोनि. टि. वाय. मुजावर यांना माहीती मिळाली, त्यांनी तत्काळ पोकॉ सुधाकर हेंबाडे यांना संबंधित ठिकाणी पाठविले. यावेळी वेश्यागृह चालविणाऱ्या दोन महिलांकडून पिडीत दोन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच संबंधित दोन स्त्रीयांविरुध्द पंढरपूर तालुका पाेलीस ठाण्यात पोकॉ सुधाकर हेंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rescue of two victims from prostitution, brothel in upper room of house, case registered against both