शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 05:54 IST

न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बुधवारी सीबीआयला व तळोजा कारागृहाला त्याच्या या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचारप्रकरणी माफीचा साक्षीदार असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने तुरुंगाबाहेर पडण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बुधवारी सीबीआयला व तळोजा कारागृहाला त्याच्या या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.

माफीचा साक्षीदार होऊनही आपल्याला तुरुंगातच ठेवण्यात आले आहे. उलट या प्रकरणातील आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याआधी दोनदा विशेष सीबीआय न्यायालयाने  सीआरपीसी कलम ३०६ (४) (बी) चा हवाला देऊन त्यांनी जामीन फेटाळला, असे वाझे याने याचिकेत म्हटले आहे. 

२ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात

वाझेवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही आणि दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे. तो माफीचा साक्षीदार असल्याने त्याच्यावर आरोपपत्र नाही आणि तो साक्षीदार असल्याने त्याला या प्रकरणात शिक्षाही होणार नाही, असे वाझेच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. खटला संपेपर्यंत माफीच्या साक्षीदाराला तुरुंगातच ठेवण्यासंदर्भात ही तरतूद आहे.  माफीचा साक्षीदाराला शिक्षा देण्यासाठी ही तरतूद नाही. परंतु, त्याने ज्या आरोपींचे कृत्य उघडे करायचे ठरविले आहे, त्यांच्यापासून त्याला संरक्षण देण्यासाठी ही तरतूद आहे, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbai High Courtमुंबई हायकोर्ट